Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेमध्ये प्रांजल चव्हाण हिने उपविजेतेपद पटकावले.”*

 *मुख्य संपादक*

        *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

   ‌.            *मो:-9730867448*



प्रोॲक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धा 2025–26 ही पुणे येथील गणेश कला क्रीडा मंडळ, स्वारगेट येथील सभागृहात उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून रिजनल स्पर्धांद्वारे १,३८७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रांजल चव्हाण हिने उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत प्रांजल हिने एच (H) श्रेणीतील इयत्ता पहिली ते दहावी या गटामध्ये उपविजेती होण्याचा मान मिळवला. प्रोॲक्टिव्ह कंपनीतर्फे तिला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले


प्रांजल ही मूळची देवतळा (लातूर) येथील असून सध्या ती इंदापूर येथील डॉ. कदम गुरुकुल या शाळेची विद्यार्थिनी आहे. गेली तीन वर्षे ती नारायणगाव येथील काईट अबॅकस अकॅडमीमध्ये अबॅकसचे प्रशिक्षण घेत होती. प्रशासकीय कारणास्तव वडिलांची बदली जुन्नर येथून इंदापूर येथे झाल्यानंतर तिला प्रत्यक्ष वर्गांना उपस्थित राहता येत नव्हते. मात्र अबॅकस शिकण्याची तिची आवड आणि जिद्द पाहून काईट अबॅकस अकॅडमीचे संचालक श्री. विनोद बढे यांनी तिला ऑनलाइन पद्धतीने अबॅकसचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात तिची आई दिपाली व वडील उद्धव चव्हाण यांनी तिला मोलाची साथ दिली.

अबॅकस हे जलद व अचूक गणिते सोडवण्याचे शास्त्र असून जपान व चीनमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अलीकडच्या काळात भारतातही अबॅकस शिक्षणाचा प्रसार वाढत आहे. अबॅकसमुळे मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण होते, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते, आकलनशक्ती व बौद्धिक क्षमतेचा विकास होतो तसेच आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या प्रांजलला अबॅकसच्या मदतीने शंभरपर्यंतचे पाढे पाठ असून ती तीन अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी व गुणाकार सहजपणे करते. अबॅकसमुळे इतर विषय समजून घेण्यासही तिला मदत होत असून तिने ऑलिंपियाड परीक्षेत गोल्ड मेडल देखील मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल समाज माध्यमांवरून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा