*विशेष-- प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज - रमजान महिन्याच्या पवित्र पहिला उपवास आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीचे औचित्य साधून अकलूज येथे ताहेरा फाउंडेशन यांच्या वतीने जुन्या बस स्थानकाजवळ सनराईज कलेक्शनच्या बाजूला पाणपोईचे उद्घाटन सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील सभापती, सदाशिवराव माने विद्यालय अकलूज यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ताहेरा फाउंडेशनच्या वतीने प्रास्ताविकात इलाही बागवान यांनी सदर भागात पाणपोईची गरज होती. गर्दीचा भाग असल्याने महिला, लहानमुले, आणि नागरिकांच्या सोयीचा हा उपक्रम राबवण्याचा ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी व फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्याचे सांगितले.
अकलूज परिसरात ताहेरा फाउंडेशन एक सामाजीक बांधिलकी जपणारी संघटना असून आजपर्यंत अनेक सामाजीक उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श समाजामध्ये निर्माण केला असल्याचे सयाजीराजे मोहिते- पाटील यांनी सांगितले. अकलूजच्या नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांनी पाणपोई उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. नगरसेवक क्रांतीसिंह माने-पाटील यांनीही पाणपोई ची सदर भागात अवश्यकता असल्याने ताहेरा फाउंडेशनचे कौतुक केले. या प्रसंगी धर्मगुरु अलहाज हाफीज गणी मौलानाही आवर्जून उपस्थित होते. सदर भागातील शॉपिंग सेंटर मधील अनेक गाळेधारक व प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी असलमभाई तांबोळी, जाकीर तांबोळी,मेंबर दादाभाई तांबोळी, हसन बागवान,शाहिद तांबोळी, शादाब तांबोळी यांनी हाजी अबूबकरभाई तांबोळी यांच्या सोबत परिश्रम घेतले.
अनेक गाळाधारकांच्या वतीने पाणपोईच्या उद्घाटनाबद्दल आणि पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याबद्दल नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त करण्यात आले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा