Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ७ मार्च, २०२६

रमजान मुबारक 2026 रोजा नंबर 17 वा शनिवार, दिनांक 07-03-2026 विषय :-अल्लाह ( परमेश्वर ) संयम करणाऱ्या बरोबर आहेत.

डॉ. सलीम शाहिदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा मल्टिस्पेशा लिटी दवाखाना 
श्रीरामपूर 
मोबाईल 9271640014..


#    दिव्य कुर आन , " हें आमच्या पालनकर्त्या ( प्रतिकूल परिस्थितीत ) हीं सहन करण्याची शक्ती आम्हाला प्रदान कर, आणि त्यांच्या समोर आम्हाला दृढतेने उभे कर. आणि या सत्य नाकारणाऱ्या लोकांविरुद्ध आम्हाला सहाय्य प्रदान कर ( सुरह नं. 2, सुरह बकरा आ. नं. 251 )
                     दिव्य कुर आन मध्ये वारंवार  अल्लाह परमेश्वर सांगतो की आम्ही संयम करणाऱ्या बरोबर आहोत.  प्रत्येक व्यक्तीला ताबडतोब उत्तर व कोणत्याही कामाचं  परिणाम हा ताबडतोब पाहिजे असतात परंतु काही काही ठिकाणी थोडं थोडया वेळाने फळं मिळत असतात.. फळं हें निश्चित भेटत  असतात.. चांगल्या कामाचं चांगलं फळं मोबदला- बक्षीस -पुरस्कार, वाईट कामं दुष्कार्म, याचं फळं अगदी तसेच भेटणार.. जमिनीत जें पीक पेरलं तेच भेटत..
संत तुकाराम महाराज,म्हणतात, " शुद्ध बीजा पोटी रसाळ फळं गोमटी " 







अगदी असंच आप आपल्या कोणत्याही कर्माचे असतं.परंतु काही गोष्टींना काही काळ वेळ जाऊ द्यावं लागतं.
                     #  दिव्य कुर आन म्हणतं,  "  सदाचारी हा आहे की ,जे अल्लाह व अंतिम दिवसा(कयामत) वर ईमान ( श्रद्धा ) धारण करतात ; तसेच , सर्व फरिश्त्यां( दुतां )वर , सर्व ग्रंथांवर , सर्व प्रेषितां( पैगंबर, संदेश वाहक ) वर इमान ( श्रद्धा ) धारण करतात व अल्लाह ( परमेश्वरा) च्या प्रेमासाठीच स्वतःला प्रिय असलेली संपत्ती आपले नातेवाईक व अनाथ -  गरजूं,  वाटसरूं  व याचक (अत्यंत दुबळे - गरीब - पीडित ) तसेच गुलामांच्या मुक्ततेसाठी खर्च करतात  ,    तसेच   ,   नमाज आदा करतात व जकात देतात , तसेच दिलेल्या सर्व वचनांची पूर्तता करतात,  आणि   किती ही तंगीं  ,अडचणी, संकटे  आणि आतिशय युद्ध( बिकट) प्रसंगी हीं संयम राखतात , ह्याच लोकांनी स्वतः ला सत्यशील ( सत्यनिष्ठ )   सिध्द केले आहे आणि हेच लोकं अल्लाहचे भय बाळगणारे  आहेत.( दिव्य कुरआन  सुरह नं. 2. अल- बकराह आ.नं.१७७) .
                    संकटात सापडायचे   ,  दु: ख झेलायचे , स्वतः  यातना सहन करावयाच्या , विरोध झेलायचं , त्यात संयमी ही राहायचं ,    स्वतःला धीर ही धरायचा,   रोजच्या दैनंदिन कटकटी ,  समस्या  सुटता सुटत नाहीत ,  सामाजिक परिस्थिती हीं फार कटकटीची होऊन जाते, मग अडचणी निर्माण होतात मग अडचणींना वैतागून,  माणूस अशा व्यापाने समस्यांनी कधी कधी वैफल्यग्रस्त होउन चुकीच्या मार्गाने जाउन गुन्हेगारीच्या विळख्यात सापडण्याची शक्यता असते.  तेथेही त्याची आशा पुर्ण नाही होवू शकली तर तो व्यसनाधीन होउन  त्याला शेवटी कधी गुन्हेगारी क्षेत्रात जाण्याची, आत्महत्ये साठी परावृत होण्याची शक्यता जास्त असते, माणूस हतबल होतं, काय करावं हें सुचतच नाही, सगळे पर्याय झालेले असतात  तरी हीं शेवटी जें होयचं तेच होतं असतं.मग मनुष्यजास्तच व्यसना धीन होतोय. अशा वेळी काही गोष्टी टाळून धीराने - धीर धरून  व संयम धरून सहन करून  शांत चित्तानें सबुरी नें घेऊन पुढे जायचं असतं आणि दिव्य कुर आन  आपल्या तीस अध्ययामध्ये वारंवार सांगतो की तुम्हीं संयम धरा संयम हें यशस्वी मार्गाची गुरुकिल्ली आहे. 
        संयम व सहनशीलते मुळे माणुस कितीही मोठ्या समस्या व संकटांच्यां  डोंगरातुनही मोठ्या कौशल्याने आपले लक्ष गाठणयात यशस्वी होतो , संयम  - सहनशीलता  बाळगणारे लोकच संसारीक व परलौकिक जीवनात यशस्वी होतात.
           #   दिव्य कुर'आन , "  बेशक , अल्लाह सब्र करनेवालों के साथ है   "  अर्थात :- " अल्लाह( परमेश्वर ) संयम- सहनशील धरणाऱ्या लोकां ( व्यक्ती) बरोबर  आहे ".
दिव्य कुराण मधे सत्तर ( ७० )ठिकाणी, वारंवार श्रध्दावानाच्यां  संयमाची धीराची कसोटीत पक्कं पास होण्यासाठी व जगात कोणतीही गोष्टीं साठी अल्लाह ने ताकीद दिली आहे व समजावून ही सांगितलेले आहेत.
                #  पुढे ,दिव्य कुर आन सांगते की, " जे श्रद्धांवान अडचणी, तंगी मध्ये कुठल्याही बिकट परिस्थिती - प्रसंगात  , संकटसमयी सत्य- असत्याच्या युध्दात संयम व धीर बाळगतात ,हेच लोक खरे सत्वशील - सत्यनिष्ठ सिध्द होतात व हेच खरे अल्लाह चे भय बाळगणारे आहेत." ( सुरहा बकरा आ नं. 177). 
जीवन हे समस्यां आणि दुःखाने ग्रस्त आहेत, आजारं, आर्थिक तंगी , अपयश,  समाजात  विरुद्ध परिस्थिती, कायमच बिकट परिस्थिती. विरोधातच कायम वातावरण, अशा एक ना अनेक प्रश्न आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला पहायला मिळतात परंतु या सर्व समस्यांना घाबरून न जाता सत्याची कास न सोडता व आर्थिक तंगीमधे व्यवस्था व्यवस्थित हाताळू न शकल्याने कधी माणुस गुन्हेगारी क्षेत्रात , कधी चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता असते परंतु हे न करता थोडं संयमाने व धीराने घेऊन अल्लाह वर भरवसा(  श्रद्धा )ठेवून  , अल्लाह शी  प्रार्थना -दुआ-करत आपले प्रयत्न हळूहळू  करत परिस्थितीत  कालांतराने  बदल होऊन सुरळीतपणे   चांगली होतं असते  , परंतु त्या वाईट काळात शांत सहनशीलता दाखवून , संयमाने घेत अपले जीवन समाधानी व पारलौकिक जीवनात सुध्दा मुक्ती मिळत असते.
        समाजात तुमच्या विरुद्ध परिस्थिती निर्माण झालेली आहेत अशा समस्यांतही  मनुष्य विचलित व गांगारुन जातो आशा परिस्थितीत माणसाला संयम -धीर धरून परमेश्वर अल्लाह वर  निंतात श्रध्दा(  इमान भरोसा )ठेवण्याची आज्ञा प्रेषित मुहम्मद स्व.  नीं  दिली आहे.
             #  प्रेषित मुहम्मद स्व सल्लम . सांगतात की,"  जेव्हा एखाद्या श्रद्धावान  एखाद्या आजारांने ग्रस्त असतो , एखाद्या विरोधी परिस्थिती निर्माण होतें , काही गोष्टीची काळजी  अथवा दु:ख किंवा त्रास होत असतो , आशा स्थिती मधे अल्लाह आशा संयमी व्यक्तींनां पुण्यं देतात ,सबाब देतात !! , एवढे च कशाला तर साधा काटा ही टोचतो , तर , तेव्हा या सर्व समस्यांमुळे अल्लाहा  त्यांचें सर्व पाप माफ करतो " ( सहीह बुखारी शरिफ).
खरोखरच  कशाहीं बिकट परस्थितीत  सुध्दा  सदाचाराची कास सोडली नाही व अल्लाह, ( परमेश्वराला) समोर इमान - श्रद्धा ठेवलं, तर नक्कीच आपण  चुकीच्या मार्गाने  कधीच जाणार नाही. 
                  #  दिव्य कुरआन मधे समस्त सृष्टींचा पालनहार वारंवार ताकीद - सक्तीने सांगतात ," बेशक , अल्लाह सब्र करनेवालों के साथ है ". 
 हेच  प्रशिक्षणाचे काम  संपूर्ण  महीनाभर  रोजा (उपवास )त चालतं, रमजान दिवसभर रोजे व संपूर्ण तीस दिवसांच्या  चोवीस तास  ट्रेनिंगमुळे संयम सहनशीलता ,धीर धरणे ची भावनाच तयार होऊन मनुष्य चारित्र्यावान ही बनतो आणि हिच  महीनाभर कमावलेल्या उर्जेचा स्त्रोत  संपूर्ण वर्षभर  टिकून राहते...
संपूर्ण श्रद्धा ( इमान ) ठेवून ( शांतता - )सबुरी बेशक  ठेवून ! सर्व गोष्टी सुरुळीत होतात,   श्रद्धा व सबुरी ठेवा त्याचं फळं निश्चितच चांगलेच असणार आहेत.
     
 " ( मित्रांनो लेख आवडला तर नक्कीच मित्र व नातेवाईकांनां -  पाठवा  ,  त्यांनाही फायदा होईल ,  प्रतिक्रिया अवश्य नोंदवा..)



लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख,
बैतुशशिफा  मल्टि स्पेशालिटी  दवाखाना 
श्रीरामपूर 
मोबाईल  :-  ९२७१६४००१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा