Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० मार्च, २०२६

*मा.आ.संजयमामा शिंदे यांच्यामुळेच ईदगाह मैदानाला भरीव निधी...* *मुस्लिम समाजबांधव कायम ऋणी राहणार- आझाद शेख*

 *मुख्य संपादक* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*

      *मो:-9730867448*



करमाळा शहरातील मुस्लिम समाजाला दिलेला शब्द पाळत मा.आ. संजयमामा शिंदे यांनी विकासकामांच्या माध्यमातून समाजाचा विश्वास जिंकला आहे. मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले ईदगाह मैदान अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत होते. या प्रलंबित कामाला गती देत ईदगाह मैदानाचे कॉंक्रिटीकरण व वॉल कंपाऊंड चे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये समाधानाची भावना आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मुस्लिम समाज बांधव त्यांचे कायम ऋणी राहील असा विश्वास आझाद शेख यांनी व्यक्त केला.

         याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की,मुस्लिम समाजाच्या दफनभूमीच्या कामालाही मा.आ.शिंदे यांच्याकडून प्राधान्य देण्यात आले असून, त्या ठिकाणी आवश्यक सुविधा निर्माण करून काम पूर्ण करण्यात आले आहे. अल्पसंख्याक निधीचा योग्य वापर करत समाजाच्या गरजा ओळखून अनेक विकासकामे हाती घेऊन ती पूर्णत्वास नेण्यात आली आहेत. त्यामुळे करमाळा शहरातील मुस्लिम समाजाच्या दीर्घकालीन अडचणी मोठ्या प्रमाणात दूर झाल्या आहेत. रमजान महिन्यात ईदची नमाज ईदगाह मैदानावरच अदा केली जाणार आहे. अनेक वर्षांनंतर सुसज्ज आणि स्वच्छ ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्याची संधी मिळणार असल्याने मुस्लिम समाजामध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

              मा.आ.संजयमामा शिंदे यांनी दिलेला शब्द पाळून दाखवल्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल मुस्लिम समाजाकडून मनःपूर्वक आभार.त्यांच्या या कार्यामुळे समाजामध्ये विश्वास आणि सकारात्मकता वाढली असल्याचे माहिती अधिकार अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आझाद (भाई)शेख,राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष आशपाक जमादार,सामाजिक कार्यकर्ते हाजी महंमद शेख यांनी सांगितले आहे.समाजाच्या विकासासाठी भविष्यातही अशाच प्रकारे कामे व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा