*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेड तर्फे रमजान पवित्र महिण्यानिमित्त अलिफ मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, भरत अवताडे तथा पंचायत समिती सदस्य म्हणाले संभाजी ब्रिगेड हि संघटना सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित घेऊन चालणारी आशी एकमेव संघटना आहे. व जाती जातीत तेड निर्माण न करता सर्व जातीतील लोकांना एकत्रित घेऊन काम करणारी व शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर सर्व समाज बांधवांचं संघटन करणारी संघटना आहे. व काही समाजकंटक जाती जातीमध्ये तेढ निर्माण करीत आहेत. व स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजकंटकांचा वापर करीत आहे. तरी काही समाज बांधवांनी अशा चेतावणी कोर लोकांपासून सर्व समाज बांधवांनी सावध राहावे. हा द्वेष रोखण्याचं काम व जातीय सलोखा राखण्याचे काम गेली कित्येक वर्षापासून मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड ही संघटना काम करत आहे. यावेळी या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष भरत अवताडे व पंचायत समिती सदस्य लिंबोरे चे सरपंच रवींद्र वळेकर मयुर रोकडे सोमनाथ रोकडे संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके,बाळासाहेब झोळ, निलेश पाटील,अतुल निर्मळ, हेमंत शिंदे, सोमनाथ जाधव,आदिनाथ माने,धन्यकुमार गारुडी, सागर साखरे, वैभव मोहिते, सचिन गारुडी, धनुभाऊ करंडे , आजित हिवरे कार्यकर्ते व बहुसंख्येने सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा