*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक* *मो. ९९२२४१९१५९*
इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पदी हर्षवर्धन मधुकर लोंढे तर उपसभापती पदी जयकुमार गोपाळ कारंडे यांची सोमवारी दि. ९ मार्च रोजी बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार गणातून मोठ्या फरकाने विजयी झाले होते. त्यामुळे पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व कायम सिद्ध केले आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी नूतन सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले आहे.
पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या निवड प्रक्रियेस जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले तर इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे तसेच गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी सहाय्यक अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी सभापती पदासाठी हर्षवर्धन लोंढे व उपसभापती पदासाठी जयकुमार कारंडे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समितीतील १६ सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषद गटनेते श्रीमंत ढोले, पंचायत समिती गटनेते बापूराव शेंडे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, सागर मिसाळ, सचिन सपकळ यांच्यासह पंचायत समितीचे नूतन सदस्य श्रीराज भरणे, हेमा माडगे, जितेंद्र वनवे, कीर्ती काळे, दिलीप भिसे, कल्पना पाटील, अर्चना खबाले, रणजीत भोंग, अनिता सोनवणे, ज्योत्स्ना सुरुडकर, विमल काळे, धनश्री पाटील, शिवाजी मोहिते उपस्थित होते.
यावेळी नूतन सभापती हर्षवर्धन लोंढे म्हणाले, सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून पारदर्शी पद्धतीने कारभार केला जाईल.
राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व कार्यकर्ते, जनतेने ठेवलेल्या विश्वासास पात्र राहून कारभार केला जाईल.
उपसभापती जयकुमार कारंडे म्हणाले, तालुक्याचे प्रश्न लक्षात घेऊन प्राधान्यक्रमाने सोडविले जातील.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा