*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक* *मो. ९९२२४१९१५९*
इंदापूर ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी संघाचे संस्थापक सुभाष जनार्दन थोरात यांची एकमताने निवड करण्यात आली. शनिवार दि. ७ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता इंदापूर ज्येष्ठ नागरिक संघाची नवीन कार्यकारणी तीन वर्षासाठी निवड करण्यात आली. ही कार्यकारणी सन २०२६ ते २०२८ पर्यंत काम पाहणार आहे. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदी सुभाष जनार्दन थोरात, संघाच्या उपाध्यक्ष पदी बाळकृष्ण क्षिरसागर आणि जवाहर बोरा, अशोक गानबोटे यांची खजिनदार, हनुमंत शिंदे यांची सचिव, रामदास जगताप यांची सहसचिव पदी निवड करण्यात आली. संघाचे मार्गदर्शक बाबासाहेब घाडगे, भानुदास पवार, नंदकुमार गुजर, पांडुरंग जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत या निवडी संपन्न झाल्या. यावेळी स्वीकृत सदस्य म्हणून श्रीमती जयश्री गानबोटे व रंगनाथ मधुरकर, प्रसिद्धी प्रमुख पदी महादेव चव्हाण, सहल प्रमुख म्हणून भारत बोराटे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक अंकुश ढुके, प्रमोद भंडारी, संपत घाडगे, हरीभाई गुजराथी, बबन क्षीरसागर, दत्तात्रेय अनपट, बळीराम शिंदे, केशव बनसुडे, हमीदभाई आत्तार, विलास गायकवाड, महादेव तावरे, विजय भामरे, दिलीप जाधव, जयश्री पोतदार, सौ. छाया जाधव व नव निर्वाचीत सदस्यांचा वृक्ष संजिवनी परिवाराच्या अध्यक्षा सौ. सायराभाभी आत्तार, चंद्रकांत देवकर, अशोक अनपट व हमीदभाई आत्तार, महादेव चव्हाण, भारत बोराटे यांच्या हस्ते फुलांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला.
नूतन अध्यक्ष सुभाष थोरात म्हणाले, जेष्ठ नागरिक हे समाजाचे आधारवड आहेत. सध्या जगण्याचे सरासरी वय ६५ आहे. त्यामुळे सर्व शासकीय योजनांचा लाभ साठ वर्ष पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांना मिळणे ही काळाची गरज आहे. जेष्ठ नागरिकांच्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा