*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
. *मो:-9730867448*
तुकारामचा शेतकरी - सेवारत्न श्री सतीश शांताबाई कुंडलिक कचरे मंडळ कृषि अधिकार
अकलुज( ISO 9001:2015 ) राष्ट्रसत तुकाराम महाराज यांची तुकाराम बीज 5 मार्च रोजी आहे यास विन्रम अभिवादन . !! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात संत तुकाराम महाराजाचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक, कौटूबीक, अहार -विहार, नितीमुल्य, कर्म, आचरण, वैद्यकिय महत्व आपणास परिचित आहे. तुकाराम महाराजांनी त्याचे अभंगातून शेती व संबंधी ही शेतकरी बंधूना शेती व शेती काम संबंधी वेळ, कर्म, प्राधान्य,, काळ यांचे महत्व विषद केले आहे ते निवड अभंगा ना अन्यन्यसाधरण महत्व आहे. १ मढे झाकुनिया करिती पेरणी ! जयासी कावले नरदेह ! ओटीच्या परिस मुठीचे ते वाढ ! या परि कैवाळे स्वहिताचे ! नाही कळा सत्ता अपुलिये हाती ! जाणते हे गुता ऊगवली ! तुका म्हणे ! पाही आपुली सुचना ! करी तो शहाणा मृत्यलोकी ! - दिलेल्या नरदेहाचा उपयोग करून घरातील कोणी वारले तरी शेतात वेळेवर शेती कामे करण्याचे महत्व विषद केले आहे. वेळ व काळ आपल्या हातात नाही म्हणून कर्म करत रहा कर्माच्या सिद्धांत विषद केला आहे . २ - मिरासीचे म्हण शेत नाही देत ! पीक उगे खोल पडे ते पीक उत्तम ! - योग्य खोलीवर व ओलीवर पेरलेले बीयाणे चांगले उगवून चांगले उत्पादन देते . ३ - गोमट्या बीजाची फळेही ही गोमटी ! - शुद्ध बिया चा वापर करा फळे रसाळ गोमटी येतील . ४ - जीवनेविना पीक नव्हे नव्हे जाण ओले मुळ भेदी खडकाचे अंग ! - पाण्याविना पीक नाही वाढ नाही उत्पन्न नाही व ओलीशिवाय मुळ वाढत नाही ! ५ - न काढीता त ण ! कैचे येती कण हाताशी ते ! तण खाई धन शेत पीक तणमुक्त ठेवा ! ६ - झाडेमुळे जीव सोईरे पाषाणा - वृक्ष वल्ली आम्हा सोयरे - वृक्ष पाषाण पशु पक्षी शेतक्याचे सोयरे आहेत त्यांना जपा जगा आणि जगू दया . ७ - शेती आले सुगी, सांभाळावे चारी कोण पिकविले तया खाणे किती ! सुगीत पीक आले त्याचा संभाळ करा मग चांगले पिकेल . ८ - घरी मोकडीया बाजा वरी वाक ळांच्या शेजा, आनंदाचे अंग आनंदाचे !! अशाप्रकारे शेती व सलग्न क्षेत्रात वेळेवर सर्व कामे केली पाहीजेत . कर्म प्रथम ! या उक्तीप्रमाणे वे ळेवर ओलीवर जगा आणि जगू दया ! नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर करून प्रथम प्राधान्य शेती व शेती पुरक व्यवसाय केले तर शेतकरी समृद्ध झालेशिवाय राहणार नाही हे युग युग पूर्व काळात संत तुकाराम महारांजाना यांनी संबोधले होते व त्याचा प्रत्यक्ष वापर करण ही काळाची गरज आहे व त्याचा अवलंब करणे हेच जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीजेला खरे अभिवादन ठरेल ! जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची माणवा !! पुंडलीक वरदेव हरी विठठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ! जगतगुरु तुकाराम महाराज की जय हो!!




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा