Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ६ मार्च, २०२६

*करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील वीट येथे शेतकऱ्याला झाले बिबट्याचे दर्शन*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील वीट या परिसरात आज शुक्रवारी एका शेतकऱ्याला बिबट्या दिसला असून सदर भागात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ माजली आहे 

वीट परिसरात एक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन जात असताना त्याला बिबट्याचे दर्शन झाले वीट परिसरात बिबट्या दिसल्याने शेतकरी बांधवांमध्ये एकच घबराट निर्माण झाली आहे सदर शेतकऱ्याने सदरचा बिबट्या आपल्या व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे सदर भागातील शेतकऱ्यांनी रात्री अप रात्री शेतामध्ये एकटे फिरू नये असे आवाहन सोलापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वीट परिसरातील शेतकरी तसेच नागरिकांना केले आहे त्याबाबत तसे वनविभागाला देखील कळविले आहे

वीट परिसरात अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी बांधव मात्र भयभीत झाले आहे सदर बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी वीट परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा