Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ६ मार्च, २०२६

*जागतिक महिला दिनानिम व डॉ* *स्वर्गीय "राधिका संदेश शहा" यांच्या* *पुण्यस्मृती निमित्त महिलांचे सौंदर्य आणि आरोग्य संवर्धन यावर इंदापुरात व्याख्यानाचे आयोजन*

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान तसेच स्व. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टच्या सभागृहात महिलांचे सौंदर्य आणि आरोग्य संवर्धन या विषयावर उद्या शनिवारी दिनांक ७ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानच्या  संचालिका स्वर्गीय डॉ. राधिका संदेश शहा यांच्या पुण्यस्मृती निमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा यांनी दिली. 

या कार्यक्रमाचा शुभारंभ ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत चे इंदापूर येथील सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भीमराव वणवे सर भूषविणार आहेत.

यावेळी पुणे येथील डॉ. विकास ओझर्डेकर हे कॅन्सर, मधुमेह तसेच इतर आजार रोखण्यासाठी मिलेट थेरपी ( भरडधान्य ) तर ब्ल्यू जय कंपनीचे प्रतिनिधी प्रवीण जाधव हे स्वयंपाक घरातून आरोग्य संवर्धन या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. 

यावेळी अकलूज येथील डॉ. संतोष काटकर हे महिलांचे सौंदर्य संवर्धन या विषयावर मार्गदर्शन आहेत. यानिमित्त विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. यानिमित्त माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा, मैत्रीण ग्रुप च्या संस्थापिका सौ. अनुराधा प्रदीप गारटकर, लिनेस क्लबच्या अध्यक्षा सौ. उज्वला प्रकाश गायकवाड, इंडियन मेडिकल असोसिएशन च्या माजी इंदापूर शाखा अध्यक्ष व स्त्रीरोगतज्ञ डॉ. कल्पना मिलिंद खाडे, महिला बचत गटासाठी प्रभावी काम करणाऱ्या सौ. निलोफर रज्जाक पठाण, सकाळ तनिष्काच्या तालुका प्रतिनिधी सौ. सारिका अमोल पवार यांना गौरविण्यात येणार असून हा कार्यक्रम विनामूल्य आहे. यातून महिलांना घरबसल्या आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य व सौंदर्य संवर्धन करण्याबरोबरच अर्थार्जन करण्याची देखील संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठान व ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा