*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
*मुंबई:* आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रशासकीय आणि पोलीस दलातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आता राज्यातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी होणार आहे.
मीरा बोरवणकर या भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी आहेत. १९८१ च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या बोरवणकर यांनी महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होण्याचा मान पटकावला होता. त्यांच्या पोलीस दलातील कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावून गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता.
------:👇👇 जाहिरात 👇👇:----
पोलीस दलातील विविध उच्च पदे भूषवल्यानंतर आता त्यांच्याकडे राज्य महिला आयोगाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महिलांचे हक्क, संरक्षण आणि सक्षमीकरण या क्षेत्रांत त्यांच्या निवडीमुळे मोठी सकारात्मक भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा