Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ मे, २०२६

इखलास या रमजान विशेषांकाने गैरसमज दूर होतील...अय्युब नल्लामंदु

 उपसंपादक - नूरजहाँ शेख 

टाइम्स 45 न्युज मराठी



सोलापूर - ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेतर्फे "इखलास" या रमजान विशेषांकाचे प्रकाशन सोलापूर जिल्हा अध्यक्षा कवयित्री डॉ. सुरैय्या जाहागिरदार व उपसंपादक खाजाभाई बागवान यांच्या नियोजनाने अतिशय थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात रोपट्यास जलार्पण करून करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गझलकारा निलोफर फणीबंद होत्या. उर्दू - मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक अय्युब नल्लामंदु यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.इ.जा.तांबोळी, प्रा डॉ.शकील शेख ,प्रा.आय.आय.मुजावर,  गझलकार साबीर सोलापूरी, हसीब नदाफ, जाफर बांगी, बी.एच, करजगीकर, दस्तगीर जमादार, इक्बाल बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खाजाभाई बागवान यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला तर अनिसा सिकंदर यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले.



   अय्युब नल्लामंदू यांनी "इखलास" या विशेषांकामुळे समाजातील गैरसमज दूर होतील.हा विशेषांक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचला पाहिजे असे मत व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषणात निलोफर फणीबंद यांनी समाजाची सकारात्मक बाजू लेखनातून मांडण्याची अपेक्षा व्यक्त केली



    प्रकाशनानंतर साबीर सोलापूरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात कवी संमेलन झाले. यात डॉ. सुरैय्या, नूरजहाँ शेख, जाफर बांगी, तहेसिन सय्यद, यांच्यासह 15 कवींनी आपल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रीय एकात्मतेवर आपल्या कविता सादर केल्या.त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवयित्री तहेसिन सय्यद यांनी केले तर आभार नूरजहाँ शेख यांनी व्यक्त केले.

------:👇👇 जाहिरात 👇👇:----




                  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा