Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ८ मे, २०२६

*महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवारी करमाळा दौऱ्यावर--* *तहसील कार्यालय तसेच भूमि अभिलेख संबंधी तक्रारी आणि* *निवेदने स्वीकारणार-- तहसील कार्यालयाच्या मनमानी कारभाराकडे महसूल मंत्री लक्ष देतील का?*

 *करमाळा-- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे येत्या दिनांक 10 मे रोजी करमाळा दौऱ्यावर असून तहसील कार्यालय तसेच भूमि अभिलेख संबंधी ज्या काही नागरिकांच्या तक्रारी असतील ते त्या दिवशी स्वीकारणार आह

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याकरिता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे येणार आहे त्यांचा शासकीय अधिकृत दौरा पुढीलप्रमाणे दिनांक 10 मे रोजी रविवारी दुपारी दीड वाजता पुणे येथून हेलिकॉप्टरने करमाळा येथे आगमन होणार असून दुपारी दोन ते तीन या कालावधीमध्ये ते करमाळा तहसील कार्यालय तसेच भूमी अभिलेख कार्यालयातील नागरिकांच्या तक्रारीचे निवेदन करमाळा तहसील कार्यालय मध्ये स्वीकारणार असून तहसील कार्यालयाच्या मनमानी आणि आरे रावी च्या कारभारामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झालेला दिसून येत असून तहसील कार्यालयाच्या कारभारा संदर्भात नागरिक दबक्या आवाजात तहसील कार्यालयाच्या विरोधात बोलताना दिसून येत आहेत याकडे महसूल मंत्री लक्ष देतील का? अशीही अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.                           


 त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी तीन वर्षापेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत राहत नाही अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या का होत नाहीत ? अशा मुजोर अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात अशी ही मागणी नागरिकातून होत आहे तसेच दुपारी तीन ते चार या वेळामध्ये तहसील भूमी अभिलेख दुय्यम निबंधक तसेच प्रांत अधिकारी या खात्यातील संबंधित अधिकाऱ्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे 

तरी करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांना सुचित करण्यात येत आहे की तहसील कार्यालय तसेच भूमि अभिलेख संबंधी ज्या काही नागरिकांच्या तक्रारी असतील त्यांनी दिनांक 10 मे रविवारी दोन ते तीन या वेळेत तहसील कार्यालय ंमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा