Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ९ मे, २०२६

*"प्रेम एक अनुभुती*या प्रेमाच्या विषया वरील अनुभूतींनी रंगली काव्य संध्या*

 *मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*

रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्यावतीने ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या साप्ताहिक बैठकीत “प्रेम एक अनुभूती” या विषयावरील काव्य संध्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे आयोजन मेसोनिक हॉल, रंग भवन येथे करण्यात आले होते.


या काव्य संध्येची संहिता डॉ. संध्या रघोजी यांनी लिहिली होती. कार्यक्रमात तेजस्विनी चांदणे, श्रीधर खेडगीकर, डॉ. सुमेधा कंदलगावकर आणि विकास धांडोरे यांनी प्रेमाच्या विविध भावछटांवर आधारित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रेम, विरह, आपुलकी आणि विविध नात्यांतील संवेदनशीलतेचे प्रभावी दर्शन या सादरीकरणातून घडले.


कार्यक्रमाला उपस्थित रसिकांनी काव्य सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साहित्यिक आणि भावस्पर्शी वातावरणात रंगलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनश्री केळकर होत्या, तर निलेश फोफलिया यांनी संयोजनाची धुरा सांभाळली.

ही काव्य संध्या उपस्थितांसाठी संस्मरणीय साहित्यिक अनुभव ठरली. मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या जुन्या कवितांची ओळख नव्या पिढीलाही व्हावी हा या सादरीकरणामागे हेतू असल्याचे डॉ. संध्या रघोजी यांनी सांगितले.  कार्यक्रमाला ज्येष्ठ रोटरी सदस्य तसेच अनेक काव्यप्रेमी उपस्थित होते. यामध्ये नियुक्त प्रांतपाल जयेश पटेल, डॉ .राजीव प्रधान , डॉ.  ज्योती चिडगुपकर, मंजुषा  गाडगीळ, डॉ . वैशाली जोशी  शांता येलंबकर, परिचिता शहा, सौम्या जक्कल, शोभा बोल्ली, अण्णासाहेब कोतली, रो. सलाम शेख आणि सिद्धांत बाबरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. मराठी भाषेला अभिजात बनविणाऱ्या साहित्याविषयी अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन  वारंवार व्हावे अशी अपेक्षा धनश्री केळकर यांनी व्यक्त केली. विद्या मणुरे यांनी   आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा