*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
मुंबई येथे भव्य पुरस्कार सोहळा संपन्न -
महाराष्ट्रात गेली 27 वर्षांपासून कार्यरत असलेल्या एकता सेवा भावी संस्था आयोजित पुरस्कार समितीच्या वतीने दिला जाणारा प्रसिद्ध " राष्ट्रीय सामाजरत्न पुरस्कार " 2026 सोहळा संपन्न झाला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्रात गेली 30 वर्षांपासून सामाजिक,कृषी, शैक्षणिक, वैद्यकीय आणि रोजगार निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या " जावेद इस्माईल अत्तार, पुणे " यांना गुरुवार दिनांक 11 जून रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यालयात, आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार रामराव वडकुते, आमदार विक्रम काळे, आमदार शिवाजीराव गर्जे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग सदस्य वसीमभाई बुऱ्हाण.
,सिने कलावंत अली खान , प्रसिद्ध गीतकार सुधाकर शर्माजी, पुणे येथील सामजिक कार्यकर्त्या श्रीमती शमीम पठाण आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अशी माहिती एकता सेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान यांनी दिली.
महाराष्ट्रात सर्वच थरातून जावेद अत्तार यांचे अभिनंदन होत आहे.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा