*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
इफको ही देशातील सहकारी तत्त्वावर चालणारी जगातील सर्वात मोठी संस्था असून यामार्फत देशाचे सन्माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नॅनो टेक्नॉलॉजीच्या आधारे नॅनो खते संशोधित केली असून याचा वापर शाश्वत शेती करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
नॅनो युरियाचा वापर हा सर्व पिकांसाठी फायदेशीर आहे. सर्व हंगामी पिकांसाठी नॅनो युरिया च्या दोन फवारण्या करून आपण पारंपरिक युरिया चा वापर कमी करून जमिनीची व निसर्गाची हानी थांबून रासायनिक खतावरील खर्चामध्ये ही बचत करू शकतो असे मत इफकोचे क्षेत्र अधिकारी विजय बुनगे यांनी केले
एकनाथ शिंदे यांचे विश्वासू कार्यकर्ते शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आठ लाख 14 हजार रुपये तिचे प्रत्येकी 220 रुपये किंमत असलेल्या 3700 नॅनो युरिया च्या बाटल्या शेतकऱ्यांना मोफत वाटपास सुरुवात विजय बुणगे यांच्या शुभहस्ते सुरू झाली
11 जून पासून ते १५ जून पर्यंत या बाटल्यांचे वाटप होणार आहे
जमिनीतून देणाऱ्या युरियाच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होतो कॅन्सर सारखे आजाराचे प्रमाण वाढते
युरियावर देणारा जाणाऱ्या सबसिडीमुळे परकीय चलनाचा तुटवडा होतो या सर्व बाबींचा विचार करता शेतकऱ्यांनी नॅनो टेक्नॉलॉजी अवगत करून शेतीची प्रगती करून बरोबर उत्पादन घ्यावी असे आव्हान
तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नेटके, कंट्रोल नियंत्रक देवराव, चव्हाण पंचायत समितीचे कृषी विभागाचे प्रमुख संभाजीराव पवार यांनी केले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा