*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*ob
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून योगप्रशिक्षक निळकंठ वाघमोडे सर व बांधकाम अभियंता आमले साहेब उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक डॉ.प्रेमनाथ रामदासी यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर निळकंठ वाघमोडे यांनी योगासने व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अतिशय सुंदर अशी योगासने सादर केली. त्यानंतर श्री.आमले साहेब यांनी आरोग्य विषयक चांगल्या सवयी यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी सौ.स्वाती गायकवाड यांनी आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती सुनीता आंदळकर मॅडम,शुभम म्हसवडे सर व श्रीमती श्रद्धा कुलकर्णी मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा