Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ जून, २०२६

सारोळा ता.औसा येथे "एकल महिला दिना"निमित्त महिलांशी साधला संवाद

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448


२३ जून रोजी जागतिक एकल महिला दिनानिमित्त सारोळा ता.औसा येथे ग्राम पंचायत कार्यालयात एकल महिलांची संवाद सभा सपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच समाधान पाटील होते तर प्रमुख उपस्थिती ग्रामविकास अधिकारी नागनाथ काळे, तर मार्गदर्शक म्हणून साऊ एकल महिला संघटनेच्या तालुका समन्वयक तथा सीआरपी ग्रामसखी अलका लोखंडे होत्या यावेळी एकल महिलांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर बोलताना अलका लोखंडे यांनी एकल महिलांच्या हक्का बाबत जाणीव करुन दिली.     



      शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले बालसंगोपन योजना ही अर्ध अनाथ व पूर्ण अनाथ म्हणजे आई किंवा वडील नसलेले किंवा दोन्ही ही नसलेल्या मुलांना दर महा २२५० रुपये मिळतात याचा लाभ घ्यावा असे सांगितले योजना, इंदिरागांधी वृद्ध पेन्शन योजना, महिलाना मालमत्तेत संधी देणे बाबत आणि ज्या एकल महिलांचे रेशन कार्ड नाही त्यांनी ते तयार करून घ्यावे. निराधार पेन्शन योजना, ज्यांना घरकुल नाही त्यांनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले शासनाच्या सर्व विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यात काही अडचण आली तर संघटना तुम्हाला मार्गदर्शन करेल अशी माहिती दिली. राज्यात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. हेरंब कुलकर्णी सर यांनी सुरु केलेल्या या संघटनेचे काम औसा तालुक्यात सुरु आहे या संघटनेत सहभागी व्हावे असे ही आवाहन अलका लोखंडे यांनी केले आहे यावेळी 

 रोजगार सेवक अमोल स्वामी ,

  चक्रधर साळुंखे ,

 ग्रामपंचायत ऑपरेटर सचिन भोसले,

महानंदा कोठे, सीआरपी ग्राम सखी माधवी कोठे सह एकूण सत्तर महिला उपस्थित होत्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा