Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १४ जून, २०२६

पुणे दत्तनगर आनंद दरबार येथे चातुर्मास २०२६ निमित्त दिनांक १८ जून रोजी राष्ट्रसंत गुरुजनांचा भव्य मंगल प्रवेश सोहळा, यानिमित्त विश्वशांती साठी सामूहिक नवकार मंत्राचे होणार पठण.

 *पुणे, डॉ. संदेश शहा*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९*


पुणे शहरातील दत्तनगर येथील आनंद दरबार येथे चातुर्मास २०२६ निमित्त गुरुवार दिनांक १८ जून रोजी गुरुजनांच्या पवित्र मंगल प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत आचार्य भगवंत प. पू. श्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या पावन चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या पुण्यभूमीत विविध पूज्य राष्ट्रसंत संत-महात्म्यांच्या सान्निध्यात हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.



या कार्यक्रमात उपप्रवर्तक राष्ट्रसंत प. पू. श्री नरेशमुनीजी म. सा., प. पू. श्री शालिभद्रमुनीजी म. सा., प. पू. श्री हार्दिकमुनीजी म. सा., प्रखर वक्ते प. पू. डॉ. मेघाश्रीजी म. सा., तसेच प. पू. समीक्षा श्रीजी म. सा., प. पू. डॉ. समृद्धीश्रीजी म. सा., प्रवचनप्रभाकर प. पू. आभाश्रीजी म. सा., प. पू. महिमाश्रीजी म. सा. आणि प. पू. श्रीयांशीश्रीजी म. सा. यांच्यासह अन्य संतवृंदांची मंगल उपस्थिती लाभणार आहे.



बंगळुरू येथील ऐतिहासिक चातुर्मास पूर्ण करून पुण्यातील पुष्कर धाम येथे चतुर्विध संघाच्या चातुर्मासानिमित्त होणारा हा प्रथम मंगल प्रवेश सोहळा असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. हा मंगल प्रवेश सोहळा कार्यक्रम गुरुवार, दिनांक १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आला असून, यानिमित्त विश्वशांतीसाठी जैन धर्माच्या पवित्र नवकार मंत्राचे सामूहिक पठण होणार आहे. त्यानंतर प्रसाद अल्पोपहार कार्यक्रम संपन्न होणार आहे. सर्व जैन श्रावक, श्राविका, बांधव व नागरिक यांनी सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे  आवाहन आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका तसेच सर्व सहकाऱ्यांनी  केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा