*उपसंपादक --नुरजहां शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळशिरस तालुक्यातील गणेशगाव येथील महादेव मोरे यांचे नातू तथा दशरथ मोरे यांचे सुपुत्र श्रीराज दशरथ मोरे याचा पहिला वाढदिवस अतिशय आनंदी, उत्साही आणि वातावरणात साजरा करण्यात आला.
कालपर्यंत आई-वडिलांच्या कुशीत अलगद विसावणारा चिमुकला श्रीराज आज आपल्या आयुष्याचे पहिले वर्ष पूर्ण करत असताना मोरे कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यांत आनंदाश्रू दिसत होते.
या अविस्मरणीय क्षणाचे औचित्य साधून मोरे परिवाराने गावजेवणाचे आयोजन केले. गावकऱ्यांनी, नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने उपस्थित राहून चिमुकल्या श्रीराजला भरभरून आशीर्वाद दिले. "बाळाचे आयुष्य निरोगी, यशस्वी आणि सुखसमृद्ध होवो," अशा शुभेच्छांनी वातावरण भारावून गेले.
नातवाच्या पहिल्या वाढदिवसाचा आनंद साजरा करताना आजोबा महादेव मोरे यांच्यासाठी हा क्षण विशेष भावनिक ठरला. कुटुंबातील नव्या पिढीच्या या पहिल्या वाढदिवसाने घरात आनंद, प्रेम आणि आपुलकीचा सुंदर उत्सव फुलला.
"एक वर्ष पूर्ण झाले... चिमुकल्या पावलांनी घरात आनंदाची फुले उमलवणाऱ्या श्रीराजच्या पहिल्या वाढदिवसाने मोरे कुटुंबासह संपूर्ण गणेशगाव आनंदाने आणि भावनेने भारावून गेले."






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा