Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २२ जून, २०२६

पुणे आनंद दरबार येथे विश्वशांतीसाठी सामूहिक नवकार महामंत्र जप, जैन धर्माचा अनादी अनंत महामंत्र म्हणजे णमोकार मंत्र होय : उपप्रवर्तक राष्ट्रसंत पूज्य श्री नरेशमुनिजी महाराज.

 पुणे, डॉ. संदेश शहा. 

दि. २२ जून २०२६

टाईम्स 45 न्यूज मराठी 

सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९



पुणे कात्रज दत्तनगर येथील आनंद दरबार, आनंद रत्न जैन स्थानक मध्ये

रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी

विश्वशांतीसाठी सामूहिक जाप मंगलमय वातावरणात संपन्न झाला. उपप्रवर्तक राष्ट्रसंत पूज्य श्री नरेशमुनिजी महाराज, परमपूज्य शालीभद्र महाराज साहेब, प्रखर वक्ता पूज्य डॉ. मेधाश्रीजी महाराज तसेच प्रवचनप्रभाकर पूज्य श्री आभाश्रीजी महाराज आदी संत महात्म्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम शेकडो श्रावक श्राविका यांच्या उस्फुर्त सहभागाने संपन्न झाला.



राष्ट्रसंत नरेश मुनीजी महाराज साहेब यांचे प्रवचन झाले.

यावेळी राष्ट्रसंत म्हणाले, जैन धर्मातील अनादी-अनंत णमोकार महामंत्र हा सर्वांत प्राचीन, पवित्र  मानला जातो. या मंत्राला कोणत्याही व्यक्ती, देव किंवा संप्रदायाचे नाव नसून तो गुणांची उपासना करणारा मंत्र आहे. 

या महामंत्रामध्ये अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि सर्व साधू या पंचपरमेष्ठींच्या श्रेष्ठ गुणांना वंदन केल्याने मन शुद्ध होते, अहंकार कमी होतो आणि आत्मकल्याणाचा मार्ग खुला होतो. णमोकार मंत्रात आत्म्याच्या शुद्धीकरणाचा आणि मोक्षप्राप्तीचा संदेश दिला असून जैन आगमानुसार या मंत्राच्या श्रद्धापूर्वक जपाने पापांचा क्षय होऊन मनाला शांतता लाभते तसेच एकाग्रता वाढते. या मंत्रांच्या १०८ वेळा जप केल्याने अतिशय तीर्थक्षेत्र, सिद्धभूमी शिखरजी यात्रेचे पुण्य मिळते. त्यामुळे सर्वांनी दिवसातून किमान दोन वेळा या मंत्राचे पठण करणे ही काळाची गरज आहे.


यावेळी आनंद दरबाराचे अध्यक्ष बाळासाहेब धोका म्हणाले, णमोकार महामंत्र ही केवळ प्रार्थना नसून, आत्म शुद्धी, सदाचार, समता, अहिंसा आणि मोक्षमार्गाकडे नेणारा सर्वसमावेशक,  सार्वकालिक आध्यात्मिक  मंत्र आहे. संघाच्या आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे आपले जीवन पवित्र झाले आहे.

कार्यक्रम यशस्वीते साठी आनंद दरबारचे सर्व विश्वस्त व कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा