*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
जयघोष,श्रद्धा,भक्ती,संस्कार आणि समाज एकतेचा अनुपम संगम घडविणारा सोहळा भक्तिभावात संपन्न.
शिवनिर्णय संघटना महाराष्ट्र वीरशैव सभा,वीरशैव लिंगायत समाज महिला व भजनी मंडळ तसेच उमाशंकर रुद्र मंडळ अकलूज (ता.माळशिरस) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री श्री श्री १०८ गुरुनिर्वाण गुरूमूर्ती रुद्रपशुपती शिवाचार्य श्री कोळेकर महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेला सामुदायिक इष्टलिंग महापूजा, पवित्र खडावा दर्शन व महाप्रसादाचा दिव्य सोहळा अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी श्री ष.ब्र.प्र. १०८ पद्मभास्कर किर्तन महर्षी डॉ. निलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्याने संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला.इष्टलिंग महापूजेद्वारे शिवभक्तांनी शिवतत्त्वाशी एकरूप होत पहिल्यांदाच असा आत्मिक समाधानाचा अनुभव घेतला.श्री कोळेकर महाराजांनी परिधान केलेल्या पवित्र वस्त्रांचे व खडावांचे दर्शन घेताना भाविकांच्या डोळ्यांत श्रद्धा आणि कृतज्ञतेचे भाव दाटून आले.
या सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरला आदर्श आई-वडील पुरस्कार २०२६ आपल्या कुटुंबाचा पाया मजबूत करत संस्कार,त्याग, प्रेम आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर पंचवीस वर्षे अधिक सांसारिक वाटचाल करत आदर्श संसार उभारणाऱ्या सात उभयतांचा पुष्पहार,शाल व महात्मा बसवेश्वर मूर्ती देऊन यावेळी गौरव करण्यात आला.सन्मानित दांपत्यांचा सत्कार होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या जीवनकार्याला मानवंदना दिली.शासकीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सुहास उरवणे सर व घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत गायत्री क्षीरसागर हिस पोलिस खात्यात नोकरी मिळाल्या बद्दल शाल,पुष्पहार व मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री धारेश्वर महास्वामीजींच्या आशीर्वचनांनी कार्यक्रमाची सांगता झाली.त्यांच्या मार्गदर्शक विचारांनी उपस्थितांना अध्यात्म,सेवा आणि संस्कारमय जीवनाचा संदेश दिला.यावेळी शिवनिर्णय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्कर्ष शेटे यांनी श्री कोळेकर महाराजांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी अकलूज येथे भव्य मठ उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.या घोषणेला उपस्थित शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले.
या कार्यक्रमाला अबालवृद्ध,
महिला भगिनी,युवक-युवती आणि समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. भक्ती,संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.
श्रद्धा,भक्ती,संस्कार आणि समाजएकतेचा अनुपम संगम घडविणारा हा पुण्यस्मरण सोहळा अकलूजच्या सामाजिक व आध्यात्मिक इतिहासात संस्मरणीय ठरला.यासाठी सर्व दाते तसेच मंगेशनाना शेटे,रामलिंग सोनके (हांडे),अशोक ज.शेटे,शेखर ढोले,सूत्रसंचालक सुहास उरवणे सर,वैभव शेटे,बापू वैद्य,केदार सोनके,नागेश झपके,ओम राजमाने,आकाश लकडे,मंगेश नरुळे यांच्यासह ज्ञात अज्ञात शिवभक्तांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा