Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ५ जुलै, २०२६

सराटी येथील जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्काम व नीरा स्नान स्थळाची गजानन पाटील व अधिकारेकडून पाहणी


*कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


पुणे जिल्ह्यातील सराटी (ता. इंदापूर) येथील जगतगूरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामस्थळाची तसेच नीरा नदीतील पादुकास्नान स्थळाची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पाहणी केली. यावेळी पालखी सोहळ्याचे नियोजन, वारकऱ्यांच्या सुविधा, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.



     श्रीक्षेत्र देहू येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम परंपरेनुसार नीरा नदीकाठी सराटी येथे रविवारी (दि. १९ जुलै) होणार आहे. त्यानंतर सोमवारी (दि. २० जुलै) सकाळी नीरा नदीत पादुकास्नानाचा शाही धार्मिक सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मुक्कामस्थळासह निरा स्नानस्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी ग्रामस्थांनी निरा नदीपात्र सध्या कोरडे असल्याने पादुका स्नानासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. त्यावर शासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करून पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन गजानन पाटील यांनी दिले.



        पाहणी दरम्यान त्यांनी पालखी मुक्कामस्थळावरील विविध सुविधांची माहिती घेतली. वारकरी, महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देतानाच पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाल्यानंतर गाव व परिसराची तातडीने स्वच्छता करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

    यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीमंत ढोले, जिल्हा परिषद सदस्य यशराज जगदाळे, उपसभापती जयकुमार कारंडे, समीर तांबोळी, उपसरपंच संतोष कोकाटे, मनोज जगदाळे, अभिजित जगदाळे तसेच पुणे जिल्हा, बारामती विभाग व इंदापूर तालुक्यातील वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो - सराटी येथील जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्काम स्थळाची पाहणी करताना गजानन पाटील व अधिकारी दिसत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा