"*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
गुणवत्ता आणि यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत अकलूजच्या नामांकित साई अकॅडमीच्या तब्बल २२ विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. हे सर्व विद्यार्थी मानाच्या शासकीय शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून अकॅडमीच्या या घवघवीत यशामुळे अकलूजसह संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांची नामावली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी या परीक्षेत आपली बुद्धिमत्ता सिद्ध करत गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले साई अकॅडमीचे यश मिळविलेले गुणवंत विद्यार्थी अद्विक बनपट्टे,अनिरुद्ध गायकवाड,स्वराज जाधव,अथर्व गोडसे,पृथ्वीराज थोरात,स्वराज मिसाळ,समर्थ चव्हाण,वेदांत चव्हाण,युवराज सावंत,ध्रुव पवार, प्रस्मित मगर,अवधुत शिंदे,संस्कार बेंदगुडे,शौर्य चिनगुडे,श्रीतेज पवार, अधिराज घोत्रे.गुणवंत विद्यार्थिनी श्रेया शिर्के,स्वरा ढाकणे,सई खुसपे,मधुरा साठे,अजमिया पठाण,स्वरा माने यांनी यश मिळवले आहे.
या यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला.या अभूतपूर्व यशाचे कौतुक करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन साई अकॅडमीच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमाला यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे भाग्यवान पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.आपल्या पाल्यांचे यश पाहून अनेक पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
*चौकट*
□ यशाचे सातत्य आणि दर्जेदार मार्गदर्शन "विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा विश्वास आणि अकॅडमीचे अचूक नियोजन यामुळेच हे यश शक्य झाले आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम आम्ही करत आहोत."
□ विशेष उल्लेखनीय म्हणजे,साई अकॅडमी ही केवळ शिष्यवृत्ती पुरतीच मर्यादित नसून,यापूर्वी देखील या अकॅडमीतील अनेक विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत सैनिक स्कूल आणि नवोदय विद्यालय येथे प्रवेश मिळवला आहे. संचालिका ज्योती प्रशांतकुमार पवार यांच्या अत्यंत शिस्तबद्ध, अभ्यासपूर्ण आणि वैयक्तिक मार्गदर्शनामुळेच'साई अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात यशाचे दुसरे नाव बनली आहे.या यशाबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांवर आणि साई अकॅडमीच्या मार्गदर्शकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
*सौ.ज्योती प्रशांतकुमार पवार* संचालिका,साई अकॅडमी अकलूज.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा