Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ जुलै, २०२६

सराटी ( ता. इंदापूर ) येथील नीरा नदी व बंधारा पाण्याअभावी कोरडा पडल्याने यावर्षी पादुकास्नान टॅकरच्या पाण्याने करण्याची प्रशासनावर वेळ

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*



          जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी पुणे जिल्ह्यातील सराटी येथील शेवटचा मुक्कामी १९ जुलैला येणार आहे. महाराजांच्या पादुकांना परंपरेप्रमाणे नीरा नदीत स्नान घालण्यासाठी नदीत पाणी नसल्याने यावर्षी टॅकरने स्नान घालण्याची वेळ पुन्हा आली आहे. नैऋत्य मौसमी पावसाने जून संपला असताना अद्यापी पाठ फिरवल्याने शेतकरी व वारकरी पावसाची प्रतिक्षा बाळगून आहेत. प्रशासनाच्या तात्पुरत्या उपाययोजनामुळे जर दोन वर्षांनंतर हा प्रसंग पाहण्याची वेळ येत आहे. 

     पुणे जिल्ह्यातील शेवटचा सराटी ( ता. इंदापूर ) येथे मुक्कामी पालखी रविवार १९ जुलैला येणार आहे. परंपरेप्रमाणे नीरा नदीकाठावर मुक्काम असल्याने पालखीतील लाखो वैष्णवांच्या अंघोळीची सोय व्हावी. तसेच महाराजांच्या पादुकांना नदीच्या पाण्याने स्नान घालण्याच्या दृष्टीने मुक्काम केला जातो. सोमवार २० जुलैला पादुकांच्या निरा स्नानानंतर पालखी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे मार्गस्थ होणार आहे. 

    मागील अनेक वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे नीरा नदी सतत कोरडी पडत आली आहे. त्यामुळे पादुकांचे नीरा स्नान सलगपणे टॅकरच्या पाण्याने केले जात आहे. यावर कायमस्वरुपी उपाय योजना आखण्याचा मानस पालखी काळात प्रशासनाकडून केला जातो. परंतू पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर पुढील वर्षीच पादुका स्नानावेळी सर्वांना जाग येते. ही बाब गांभीर्याने घेतली जात नसल्याने वारकरी व भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

     पालखीतील लाखो वैष्णवांना नीरा नदी चालत सहजरित्या पार करता यावी यासाठी बंधारा कम रस्ता करण्यात आला आहे. परंतू बंधाऱ्यावरील स्लॅब उखडला व फुटला असून दुतर्फा असणारे कठडेही तुटलेले आहेत. पाटबंधारे विभाग प्रतीवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा करतात. परंतू नीरा नदी ओलांडताना कोणाला ईजा होऊ नये यासाठी संरक्षक लोखंडी ग्रील उभारणी का करत नाहीत?. तसेच बंधाऱ्या लगत नदीपर्यत जायला सिमेंटचा रस्ता करण्यात आला. परंतू नदीत पादुकांना स्नान घालण्यासाठी सिंमेंटचा कठडा अथवा ओठा करण्यात आला नाही. प्रत्येक वर्षी शेवाळलेल्या पाण्यात उभा राहून अंघोळ घालण्याची वेळ मान्यवरांवर येत आहे.

 चौकट - मागील अनेक वर्षापासून नीरा नदी पाण्याअभावी कोरडी पडत आहे. त्यातच पावसाने दडी मारली असल्याने नदी पट्ट्यातील गावात टॅकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर दुष्काळाची दाहकता गंभीर बनत चालली असून नीरा नदी कोरडी पडल्याने पादुकांचे स्नान टॅकरच्या पाण्याने करण्याची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सदर बाबतीत गांभीर्यपूर्वक कायमस्वरूपी निर्णय घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

फोटो  - सराटी ( ता. इंदापूर ) येथील नीरा नदी व बंधारा पाण्याअभावी कोरडा पडल्याने यावर्षी पादुकास्नान टॅकरच्या पाण्याने करण्याचे वेळ प्रशासनावर आली आहे.

.....................................................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा