*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा, दि. 23 : “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. भारत सरकारच्या आर्थिक समावेशनाच्या उद्दिष्टपूर्तीत डाक कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,” असे प्रतिपादन पंढरपूर विभागाचे डाक अधीक्षक श्री. मुन्ना कुमार यांनी केले.यशकल्याणी सेवाभवन येथे भारतीय डाक विभागाच्या महामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष डॉ.गणेश करे-पाटील उपस्थित होते.
डॉ.करे-पाटील म्हणाले, “भारतीय डाक विभागाने काळानुरूप आपले स्वरूप बदलत सर्वसामान्यांच्या विश्वासाचे केंद्र म्हणून स्थान टिकवले आहे. ग्रामीण भागातील छोट्या बचतीला आर्थिक सुरक्षिततेत रूपांतरित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डाक विभाग करत आहे. सुकन्या समृद्धी, टपाल जीवन विमा आणि विविध बचत योजनांचा नागरिकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा.”
यावेळी यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ५० मुलींची सुकन्या समृद्धी खाती उघडून त्यांच्या सुरक्षित भविष्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. ‘माय स्टॅम्प’च्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्याच्या उपक्रमाचेही डॉ. करे-पाटील यांनी कौतुक केले.
कार्यक्रमास डाक निरीक्षक लक्ष्मण शेवाळे, सब पोस्टमास्तर उदय बंडगर, जीवन शिक्षण फाउंडेशनचे जयेश पवार तसेच करमाळा, जेऊर व केतूर येथील डाक कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रमेश शेलार यांनी केले.
मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*ग्रामीण भारताच्या सक्षमीकरणासाठी डाक विभागाने जनतेपर्यंत पोहोचावे - मुन्ना कुमार* *यशकल्याणी सेवाभवनात डाक महामेळावा; ५० मुलींच्या ‘सुकन्या समृद्धी’ खात्यांना यशकल्याणीचा पुढाकार...*
*ग्रामीण भारताच्या सक्षमीकरणासाठी डाक विभागाने जनतेपर्यंत पोहोचावे - मुन्ना कुमार* *यशकल्याणी सेवाभवनात डाक महामेळावा; ५० मुलींच्या ‘सुकन्या समृद्धी’ खात्यांना यशकल्याणीचा पुढाकार...*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा