*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेस पुर्णपणे बागल कुटुंब जबाबदार असून त्यांच्या सत्ता काळातील भ्रष्टाचार व विविध बँकेच्या माध्यमातून घेतलेली कर्जे, त्यांची लावलेली विल्हेवाट आणि थकवलेल्या कर्जाचे भरमसाठ झालेले व्याज यांची आकडेवारी एक श्वेतपत्रिका छापुन तालूक्यातील जनतेच्या समोर पाटील गट मांडणार असल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की सध्या आदिनाथ कारखान्याच्या लिलावास आमचे विरोधक हे केवळ राजकीय द्वेषापोटी आमदार नारायण आबा पाटील यांना जबाबदार धरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. सभासद व जनतेच्या समोर चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आपली राजकीय पोळी लाटण्याचा त्यांचा हा डाव आम्ही हाणुन पाडणार आहोत. बागल यांच्या काळात काढलेले कर्ज वेळेत भरलेलेले नसल्याने थकीत कर्ज व भरमसाठ व्याज यामुळेच एका संस्थेने आदिनाथ कारखाना विक्रिस काढला आहे. आमदार नारायण आबा पाटील यांच्या काळात एका रुपयाचा ही आर्थिक व्यवहार झालेला नाही. यामुळे मग आता खरी वस्तुस्थिती जनतेसमोर येणे गरजेचे असल्याने आम्ही गावोगाव जाऊन तसेच सोशल मिडीयाचा वापर करुन आणि पत्रकारांना साक्षी ठेऊन बागल यांच्या काळ्या कारभाराची पोलखोल करणार आहोत. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने भ्रष्टाचार झाकला जाईल या मोठ्या भ्रमातुन बागल यांनी बाहेर येऊन वेळीच जनतेसमोर सगळे सत्य मांडून माफी मागावी. आदिनाथ वाचवण्यासाठी विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांना मंत्रालयीन स्तरावर आडकाठी आणण्याचे सोडुन द्यावे. अजुनही वेळ गेलेली नसुन तालूक्याच्या हितासाठी वरीष्ठ पातळीवर एकत्र येऊन आदिनाथ वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा तुमचा करेक्ट राजकीय कार्यक्रम करण्यास जनता मागेपुढे पाहणार नसल्याचा सुतक इशारा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिला आहे.
मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
बागलांच्या काळातील आदिनाथ मधील भ्रष्टाचार व आर्थिक लेखाजोखा श्वेतपत्रिका काढून सभासदांच्या समोर मांडणार, पाटील गटाची घोषणा
बागलांच्या काळातील आदिनाथ मधील भ्रष्टाचार व आर्थिक लेखाजोखा श्वेतपत्रिका काढून सभासदांच्या समोर मांडणार, पाटील गटाची घोषणा
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा