Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२६

*मा.आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या न्यायालयीन लढ्याला यश...* *शेतकऱ्यांच्या हक्काचे २२७ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा..*.

 *तुळजापूर-- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो:-9730867448*



शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले साहेबांनी खरीप २०२० पीकविमा प्रकरणी मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ आणि त्यानंतर मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढलेल्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश आले आहे.


या निकालामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी रुपयांची पीकविमा रक्कम वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ५७ हजार २८२ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जवळपास ९ हजार रुपये या प्रमाणात पीकविमा रक्कम येत्या आठवडाभरात त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

या न्यायालयीन लढ्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले साहेबांनी मा.सर्वोच्च न्यायालय, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.अतुल डख तसेच या लढ्यासाठी आवश्यक माहिती संकलित करून मोलाची मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल जगताप यांचे मनःपूर्वक आभार मानले.

दुष्काळ आणि नापिकीच्या संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी मिळणारी ही आर्थिक मदत मोठा आधार ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा