*सोलापूर--- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
आज दि 28/11/26 रोजी मोहोळ पोलीस ठाणे अंतर्गत अपघात नियंत्रण प्रबोधन व झिरो फॅटीलिटी बाबत कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाकरिता प्रभारी अधिकारी, दीपक पाटील,मोहोळ पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ विद्यालय मोहोळ येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक स्टाफसह, NHAI अधिकारी व कर्मचारी, महामार्ग वाहतूक सुरक्षा पथक अधिकारी व कर्मचारी, मोहोळ पोलीस ठाणे कडील अपघात विभाग, वाहतूक शाखा अंमलदार सावळेश्वर टोल नाका कडील पेट्रोलिंग मोबाईल, असा सामूहिक रित्या अपघात नियंत्रण प्रबोधन व झिरो फॅटीलिटी कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घेण्यात आला. त्यामध्ये अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शन व उपाययोजना करिता
1) दुचाकी चालवताना चालक व मागील प्रवाशांनी हेल्मेट वापरणे
2) चार चाकी वाहनात सीडबिल्ट लावणे
3) वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे किंवा मोबाईल वापरणे टाळणे
4) मद्यपान करून वाहन चालवू नये
5) वाहनाची कागदपत्रे जवळ बाळगणे (उदा. वाहन परवाना आरसी विमा व पियूसी )
6) वेग मर्यादेचे पालन करणे
7) वाहन चालवताना रस्त्या वरच्या लेन चे नियम पाळणे
8) चुकीच्या दिशेने ( वनवे विरुद्ध )वाहन चालवू नये
असे मार्गदर्शन करण्यात आले.
9) वैद्य परवाना असल्याशिवाय वाहन चालू नये.
10) अल्पवयीन विद्यार्थी यांनी वाहनाचा वापर करू नये तसेच पालकांनी अल्पवयीन विद्यार्थ्यांना वाहन ठेवण्यास देऊ नये.
11) रस्ता ओलांडताना , काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा