Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२६

*पंढरपूर तालुक्यातील जळोली येथील बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू* *रात्रभर बचावकार्य; सकाळी बालिकेला बाहेर काढण्यात यश, मात्र मृत्यू झाल्याने हळहळ*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448*


पंढरपूर ,(२३): पंढरपूर तालुक्यातील जळोली

येथे शेतातील बंद बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उष्मती राहुल गावित (वय १.५ वर्षे, रा. शिसा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) असे मृत बालिकेचे नाव आहे



दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जळोली येथील साखर कारखान्यालगत गोरख कांतिलाल नरसाळे यांच्या शेतातील बंद बोअरवेलमध्ये ऊसतोड मजुराची ही बालिका पडली होती. अंदाजे ४५ ते ५० फूट खोलवर बालिका अडकल्याची माहिती मिळताच प्रशासन व बचाव पथकांकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, करकंब पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, बीट अंमलदार, पोलीस पाटील तसेच दोन बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. रात्रभर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते.

दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बचाव पथकाला बालिकेला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेत बालिकेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा