Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

कोल्हापूर जिल्हा वकील सहकारी पतसंस्थेचे 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न


 

अकलुज ---प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी

                           कोल्हापूर जिल्हा वकील सहकारी पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर येथील शाहू हॉलमध्ये पार पडली.सभेच्या सुरुवातीस अहवाल सालात दिवंगत झालेले ज्ञात अज्ञात सभासद कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सभासद संस्थेचे ठेवीदार हितचिंतक थोर नेते साहित्यिक सिने कलावंत खेळाडू यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली.

         यावेळी संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.प्रशांत देसाई यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष संजय घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला तर सेक्रेटरी ॲड.अमोल उर्फ तेजगोंड पाटील यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सभेपुढील विविध विषयास अनुसरून व सूचनांचा विचार करून एकमताने मंजुरी घेण्यात आली व सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली 

      सभेचे प्रास्ताविक ॲड. विक्रम सावंत यांनी केले तर अहवाल वाचन सेक्रेटरी मोहन पाटील यांनी केले संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय घाटगे यांनी विविध सूचनांचा अंमल येणाऱ्या काळात तात्काळ केला जाईल असे आश्वासन दिले सभेचा समारोप व आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.सुधीर चव्हाण यांनी केले     

          यावेळी संस्थेचे संचालक ॲड.उदय जाधव,ॲड.अमृता पाटोळे,ॲड.मीना पवार,ॲड. सायराबानू सनदी,ॲड.पांडुरंग पवार,ॲड.पंडितराव बंडगर,ॲड.कोमलराव राणे ॲड.धनंजय पाटील व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा