Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०२३

पुण्यात ईद मिलादुन्नबी निमित्त शेर- ए- हिन्द फाऊंडेशन चा अनोखा उपक्रम .

 


पुणे शहर --- प्रतिनिधी

रियाज मुल्ला 

टाइम्स 45 न्युज मराठी

मो. 7020 873 300

                        हिजामा ( कपिंग थेरपी ) ही एक प्राचिन हेल्थ थेरपी असून जवळ जवळ पाच हजार वर्षांपासून या थेरपीचा वापर आरोग्यासाठी करण्यात आलेला आहे. कपिंग थेरपीमध्ये कपमधून व्हॅक्युम तयार करून ते शरीरातील खास केंद्रबिंदूंवर ते लावते जातात. कपिंग थेरपी ही एक पारंपरिक आणि प्राचिन उपचार पद्धती असून पूर्वी हे कप आयुर्वेदिक औषध अथवा कागदाने गरम केले जात असत. आजकाल या कपला हिजामा असं म्हटलं जातं. या कपमुळे स्नायू कमी प्रेशरवर खेचले जातात. आणि तुमच्या स्नायूंना चांगला आराम मिळतो. यालाच हिजामा थेरपी असे देखील म्हटले जाते वडगाव शेरीतील सामाजिक संघटना शेर ए हिंद फाऊंडेशनच्या वतीने ईद मिलादुन्नबीचे औचित्य साधून लोकांना याचा लाभ मोफत उपलब्ध करून दिला आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजहर खान यांनी या हिजामा कार्यक्रमाचे आयोजन केले



 

तर ईद मिलादुन्नबीला विविध मंडळे गाणे वाजवण्यासाठी स्पिकरला लाखो रुपये खर्च करत असत परंतु शेर ए हिंद फाऊंडेशनच्या वतीने एक अनोखा असा उपक्रम करून स्पीकरच्या आवाजापासून दूर राहून हिजामा कार्यक्रमाचे आयोजन करून लोकांसमोर एक मोठा आदर्श ठेवला या कार्यक्रमात सुमारे २५०० महिला आणि पुरुषांनी लाभ घेतला तसेच या कार्यक्रमाला मा.आमदार बापूसाहेब पठारे, नारायण गलांडे, काँग्रेस पक्षाचे अप्लसंख्याक विभाग पुणे शहर अध्यक्ष समीर शेख, आतिक शेख, मोहसीन भाई, काँग्रेस पक्षाचे परिवहन विभाग पुणे शहर अध्यक्ष मा. अय्याज खान, अजीम आत्तार, युसूफ खान, साजिद शेख, इम्रान खान, सलीम सय्यद, समीर सय्यद, शोएब पठाण, इरफान शेख, हैदर शेख व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजहर खान यांनी मानले




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा