Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्षपदी हामा पाटील यांची नियुक्ती

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

                                -पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्षपदी हामा शिवाजी पाटील (कौठळी ता. इंदापूर) यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी दिले आहे.



    राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय मामा भरणे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ध्येय, धोरणे, आचार विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहाल, असे हामा पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

    यापूर्वी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपवली होती ती मी समर्थपणे पार पाडल्याने त्या कामाची दखल घेत जी नवीन जबाबदारी दिली आहे ती पुर्ण ताकदीने काम करून पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हामा शिवाजी पाटील यांनी निवडी प्रसंगी बोलताना सांगितले.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा