Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

पिंपरी बुद्रुक येथील लोकनेते महादेवराव बोडके (दादा) विद्यालयात विद्यार्थी रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन, यामध्ये ४९० विदयार्थी, विदयार्थीनींची तपासणी

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी 

एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

                  - लोकनेते महादेवराव बोडके (दादा) विद्यालय पिंपरी बुद्रुक येथे विद्यार्थी रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ४९० विदयार्थी, विदयार्थीनींची तपासणी करण्यात आली.

     पिंपरी बुद्रुक येथील लोकनेते महादेवराव बोडके (दादा) विद्यालयात विद्यार्थी रक्तगट तपासणी शिबीराचे उद्घाटन दोशी पॅथलॅब लॅबोरेटरीचे डॉ बाहुबली शहा, सरपंच भाग्यश्री बोडके, माजी सरपंच ज्योती बोडके, अकलूज कारखान्याचे संचालक श्रीकांत बोडके, सोसायटीचे माजी अध्यक्ष सुदर्शन बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, पांडुरंग बोडके, उपसरपंच संतोष सुतार, बाळासाहेब घाडगे, मुख्याध्यापक भारत कोरटकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदिसह मान्यवर उपस्थित होते.


    पिंपरी बुद्रुक येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात अकलूज येथील दोशी पॅथलॅब लॅबोरेटरीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ ते ४ पिंपरी बुद्रुक, सुतार वस्ती तर लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयाच्या ५ ते १० वीच्या ४९० विदयार्थी, विद्यार्थीनींची तपासणी करण्यात आली.


     तसेच रविवार दि.१७ रोजी लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना हेल्मेट, पाणीजार भेट देण्यात येणार आहे.

फोटो - पिंपरी बुद्रुक येथे शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा