Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

*दोघे चोरटे दुचाकीवरून आले* *प्रथम ज्येष्ठांच्या पाया पडले* *बोलण्यात गुंतवले अन्....* *सोन्याचे अंगठी लंपास केली* *या घटनेने खळबळ*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

             पुणे: बँकेत चाललेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या पाया पडून त्यांच्या हातातील चाळीस हजार रुपये किंमतीची दहा ग्रॅम वजनी सोन्याची अंगठी चोरट्यांनी लंपास केली. या चोरट्यांनी दिवंगत आईच्या नावाने देवळात हार-फुले आणि एक हजार एक रुपये अर्पण करायची बतावणी करत हातचलाखीने अंगठी चोरल्याने ज्येष्ठ नागरिक हवालदिल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 

पर्वती दर्शन परिसरातील पंचशील चौकात दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत ८४ वर्षांच्या ज्येष्ठाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदार ज्येष्ठ नागरिक चालत बँकेत निघाले होते. 

पंचशील चौकात दुचाकीवरील दोघां चोरट्यांनी त्यांना थांबविले.

 त्यापैकी एकाने त्यांच्या पाया पडून आपली आई वारल्याची बतावणी केली. 

मला सुतक असून, माझ्या आईच्या नावे हार-फुले आणि एक हजार एक रुपये देवाला अर्पण करायचे आहेत. त्यासाठी या परिसरात मंदिर आहे का ? , 

अशी विचारणा त्याने ज्येष्ठ नागरिकाकडे केली. त्यानंतर चोरट्याने खिशातून नोटा काढून त्याला सोन्याचा स्पर्श करायचा आहे,

 असे सांगत ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी लांबवून पोबारा केला. घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. चित्रीकरण तपासून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा