Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

*ज्येष्ठ मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना "महाराष्ट्र भूषण पुरस्कार "प्रदान..*

 


*उपसंपादक --- नूरजहाँ*

*टाइम्स 45 न्युज मराठी

                ज्येष्ठ मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते अभिनयसम्राट अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. काल महाराष्ट्र भूषण २०२३ वितरण करण्यात आलं.५७ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा काल पार पडला. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. वरळीतीतील एनएससीआय डोममध्ये हा सोहळा पार पडला.

अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह मराठी रंगभूमीवरील अतुलनीय योगदानाबद्दल या अभिनेत्याला राज्याच्या या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे.

               *कोकण*

             *कोकण न्यूज*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा