इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- सराटी (ता. इ़दापूर) ग्रामपंचायतच्या विविध विकास कामासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी ७५ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब कोकाटे यांच्या प्रयत्नामुळे मंजूर केला आहे. यापुर्वीही अशाच प्रकारे ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करून कामे केली आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खास विश्वासू व आमदार दत्तात्रय भरणे यांचे समर्थक युवा नेते व सराटी ग्रामपंचायतचे सदस्य अण्णासाहेब कोकाटे यांनी आपल्या धाडसी प्रयत्नातून निधी खेचून आणण्याचा व विकास कामे करण्याचा धडाका लावला आहे. त्यांनी निवडून आल्यापासून जवळपास एक कोटीच्या वरतीचा निधी खेचून आणून विविध विकास कामे मार्गी लावली आहेत.
त्यामध्ये मंजूर कामे पुढीलप्रमाणे - १) सराटी येथील कॅनल पटी रोड ते भगवान कोकाटे घराकडे रस्ता बनवणे २० लाख, २) विजय ज्ञानदेव कोकाटे ते गणेशवाडी रोड पर्यंत गटर व रस्ता बनवणे १० लाख, ३) युवराज जगदाळे घर ते रोड पर्यंत गटर बनवणे १० लाख, ४) भगतवाडी रोड ते संतोष दत्तात्रय कोकाटे वस्ती रस्ता बनवणे
१० लाख, ५) निरनिमंगाव रोड ते वसंत प्रल्हाद कोकाटे वस्ती रस्ता बनवणे १० लाख,
६) भारत उबाळे घर ते औदुंबर ज्ञानदेव कोकाटे घर रस्ता बनवणे १० लाख, ७) तुळजाभवानी मंदीर ब्लॉक बसविणे ५ लाख
असे ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
बावडा लाखेवाडी जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून प्रबळ दावेदार असणारे अण्णासाहेब कोकाटे हे सर्वसामान्य कुटुंबातून येतात. त्यांची काम करण्याची पद्धतीमुळे ते सर्वसामान्यांमध्ये सर्व परिचित आहेत. बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये आज पर्यंतच्या इतिहासात घराणेशाही असणारे उमेदवारच देण्यात आले आहेत. यावेळी मात्र घराणेशाहीला फाटा देऊन सर्वसामान्य कुटुंबातील व सतत कामात अग्रस्थानी असणारे अण्णासाहेब कोकाटे यांनाच उमेदवारी द्यावी अशी सर्वसामान्य नागरिकांतून मागणी होत आहे.
फोटो - आण्णासाहेब कोकाटे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा