Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २१ डिसेंबर, २०२५

*अखेर अकलूज नगरपरिषदेच्या चाव्या मोहिते पाटील यांच्या हातात....* *महाविकास आघाडीचे शिवसेनेच्या २ उमेदवारासह २२ उमेदवार विजयी तर ४ उमेदवार भारतीय जनता पक्षाचे विजयी*

 *संपादक  हुसेन मुलाणी--टाइम्स 45 न्यूज मराठी**

*मो:--  9730 867 448*



आशिया खंडातील एकमेव सर्वात मोठी असलेली अकलूज ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपरिषद मध्ये झाल्यानंतर प्रथमच अकलूज नगर परिषदेची निवडणूक चुरशीची झाली त्यामध्ये ज्यामध्ये पॅनल टू पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष, भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र विकास सेना, या पक्षाच्य उमेदवारानी निवडणूक लढवली आणि नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या च्या, रेश्मा लालासाहेब आडगळे, भारतीय जनता पार्टीच्या पूजा कोतमिरे ,महाराष्ट्र विकास सेनेच्या- सुवर्णा साठे, वंचित बहुजन आघाडीच्या -उषा कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या दिव्यानी  रास्ते, या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात होत्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या उमेदवार रेश्मा लालासाहेब आडगळे यांनी आघाडी घेत विजयी झाल्या या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते ज्यामध्ये २०  नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडून आले आणि भारतीय जनता पार्टीचे 

                        ----; जाहिरात:---



४ उमेदवार निवडून आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षाला महाविकास आघाडीतून मित्र पक्ष म्हणून दोन जागा मिळाल्या होत्या निवडणूक रिंगणात  ते दोन्हीही उमेदवार विजयी झाले आहेत आणि शेवटी मतदाराने मोहिते पाटलावर विश्वास ठेवून घवघवीत यश प्राप्त करून दिले अकलूज आणि मोहिते पाटील हे समीकरण आजतागायत टिकून असल्याचे मतदाराने सर्व जगाला दाखवून दिले आणि अखेर मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बाजी मारली निवडणूक काळात मोहिते पाटील यांच्यावर बरेचशा टीका टिपण्या झाल्या त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा आरोप झाला मात्र अकलूज मध्ये मोहिते पाटलाची दहशत नाही हे नागरिकांनी मतदानाच्या रूपाने दाखवून दिले असल्याचे नगराध्यक्ष पदाच्या निवडून आलेल्या उमेदवार रेश्मा लालासाहेब आडगळे यांनी म्हटले आहे 

या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश प्राप्त झाल्याबद्दल जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील शिवतेजसिंह मोहिते पाटील, संग्राम सिंह मोहिते पाटील  सयाजी राजे मोहिते पाटील  किशोरसिंह माने पाटील , क्रांतिसिंह मोहाने पाटील इत्यादी मोहिते पाटील आणि माने पाटील परिवाराने अकलूज पंचक्रोशीतील मतदारांचे शतशः आभार मानले

अकलूज नगर परिषद निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे


नगराध्यक्ष --रेश्मा लालासाहेब आडगळे   राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष      

     ‌.          

 १युवराज दोरकर -राष्ट्रवादी काँग्रेस एस.पी

१ वैशाली भोसले -राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

२ प्रियंका लखन गायकवाड- राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

२ सचिन देशमुख--राष्ट्रवादी काँग्रेस एसपी

३ विशाल मोरे- राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

३ नम्रता राहुल जगताप --राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

४ मोहसीन बाबू शेख -राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

४ मंदाकिनी पाटोळे--राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

५ रेशमा इकबाल तांबोळी-राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

५ सयाजी राजे मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

६ उज्वला विटकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

६ पृथ्वीराज अंबुरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

७ मृदुला महेश सूर्यवंशी--राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

७ क्रांतिसिंह माने पाटील --राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

८ दिपाली संतोष वाघमोडे --भाजपा*

८ महेश शिंदे ---भाजपा*

९ राहुल लोंढे-- भाजपा*

९ प्रतिभा विलासानंद गायकवाड-- राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

१० मनीषा मोहन तिकोटे--+ राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

१० विलास गणपत क्षिरसागर-- राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

११ नाशिकराव सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस एस.पी

११ शितल परशुराम बंदपट्टे --राष्ट्रवादी काँग्रेस एस .पी

१२ स्वाती फुले --राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

१२ शिवतेजसिंह मोहिते पाटील-- राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

१३ नामदेवराव गलांडे-- राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

१३ जयश्री एकतपुरे --भाजपा*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा