Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २३ मार्च, २०२४

*तामलवाडी ता. तुळजापूर येथे आचारसंहितेचा भंग "शिवाजी सावंत "यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार*

 



*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

         भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशांच्या आदर्श आचारसंहितेचा अधिकारी व कर्मचारी यांनीच भंग केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तुळजापूर विधानसभा अध्यक्ष शिवाजीराव रामकृष्ण सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून याबाबत सविस्तर वृत्त असे की





                २४१- तुळजापूर लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेच्या आदेशाप्रमाणे तुळजापूर पंचायत समितीचे आचारसंहिता कार्यक्रमाप्रमाणे फिरते गस्त पथक (फ्लाईंग स्कॉड) व सहाय्यक म्हणून कार्यरत असताना मौजे तामलवाडी येथील महिला अल्पसंख्याक सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक सौ नूरबानू सिकंदर बेगडे यांच्या विरोधात शासकीय (जीर्ण ४५ वर्षापूर्वीची) इमारत तथा सार्वजनिक शौचालय विनापरवाना अनुक्रमे नवीन सभामंडप व जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याचे टाकीचे बांधकाम करण्याकरिता पडल्याबाबत राजकीय सूट भावनेतून केलेल्या तक्रारीची चौकशी सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली येऊन तसेच संबंधित महिला सरपंच या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना त्याबाबत लेखी स्वरूपात कळवूनही तुळजापूर पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी श्री सुरेश गायकवाड यांनी विस्तार अधिकारी (पं) श्री ए.सी. कावळे यांच्या नेतृत्वाखाली श्री व्ही. व्ही.काळे शा.अभियंता (बां) जि. प. उपविभाग तुळजापूर, श्री बी.एल. वाघमारे उपअभियंता (बां) जि.प. उपविभाग तुळजापूर, श्री चैतन्य गोरे ग्रामसेवक ग्रामपंचायत तामलवाडी व श्री अमोल ताकभाते (सध्या सुट्टीवर) गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर या सर्वांनी चौकशी आदेश मागील तारखेस म्हणजे १४ मार्च २०२४ रोजी साक्षंकित दाखवून दिनांक १७ मार्च २०२४ रोजी महिला सरपंच नूरबानू सिकंदर बेगडे यांचे पती श्री सिकंदर वाहेद बेगडे यांच्या मोबाईल नंबरच्या व्हाट्सअप वर पाठवून सरपंचाच्या गैरहजेरीत दिनांक १९ मार्च व २० मार्च २०२४ रोजी वरील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी द्वारे चौकशी करून महिला सरपंचाला अपात्र करण्याचे षड्यंत्र केले गेले आहे व या सर्व चौकशीचा कळत नकळत प्रभाव मतदारावर होणार असल्यामुळे भारतीय संविधानाचा अपमान तथा लोकशाहीची हत्या करण्याचा घोर अपराध केला आहे त्यामुळे त्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत जेणेकरून लोकशाही टिकवण्याचे किंवा मजबूत करण्याचे काम आपण कराल असे तक्रारी निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारसाहेब चे तुळजापूर विधानसभा अध्यक्ष शिवाजी रामकृष्ण सावंत (माजी सैनिक) यांनी मा. मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, आयुक्त छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी धाराशिव, तहसीलदार तुळजापूर, गट विकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांच्याकडे लेखी स्वरूपात दिले आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहितेच्या बगडयाबाबत खळबळ माजली आहे तसेच निवडणूक आयोग याबाबत काय कारवाई करते त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा