Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ७ जून, २०२४

*माळशिरस तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार -" नागनाथ साळुंके" यांचे अकाली जाण्याने दुःख*

 


*श्रीपूर--बी.टी.शिवशरण.

माळशिरस तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचे अकाली जाण्याचे दुःख झाले आहे आज कोणाच्या मनी ध्यानी नसताना एक दुखःद बातमी मिडिया वर पहायला मिळाली आणि मनस्वी दुःख झाले अकलूज येथील ज्येष्ठ पत्रकार नागनाथअण्णा साळुंखे यांचे अकस्मात दुःखद निधन सोलापूर येथे रुग्णालयात घेऊन जात असताना रिक्षातच निधन झाले अतिशय विनम्र साधे भोळे व गोरगरिबांना मदतीला धाऊन जाण्याचा अण्णांचा स्वभाव होता अशाच दुःखद घटना माळशिरस तालुक्यातील माझे जिवाभावाचे सहकारी पत्रकार मित्र आम्हाला सोडून गेल्याने त्यांच्या जाण्याने माळशिरस तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे ज्येष्ठ पत्रकार मारुती मामा शिंदे भारत नायकुडे सुभाष एखतपुरे प्रसाद जोगळेकर व आज नागनाथअण्णा साळुंखे यांनी अकाली एक्झिट घेतली आहे या सर्वांचा माझा व्यक्तीगत सहवास आपुलकीचे नाते जिव्हाळा आदर होता माळशिरस तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात मारुती मामा शिंदे मला सिनिअर होते पण ते मी साप्ताहिक गस्त चा कार्यकारी संपादक असताना त्यांचा व माझा अनेकदा संबंध आले त्यांनी मी ज्येष्ठ आहे हे कधी जाणवू दिले नाही गस्त च्या परखड वाटचालीसाठी त्यांनी वेळोवेळी कौतुक करुन सहकार्य केले भारत नायकुडे हे साप्ताहिक चे संपादक होते अतिशय दूरदर्शी व स्पष्ट विचार निर्भीड लिखाण यामुळे आमची मैत्री जुळली होती सुभाष एखतपुरे हे उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून तालुक्यात प्रसिध्द होते त्यांनीही सुरवातीला जिल्हा दैनिकात वार्ताहर ते स्वःता चे साप्ताहिक काढले या क्षेत्रात त्यांनी वेगळेपण जपले अनेक विषयांवर त्यांनी लिखाण केले माळशिरस तालुक्यात पत्रकारिता गाजवली व वाजवली ते माझे जवळचे मित्र व संपादक प्रसाद जोगळेकर यांनी अत्यंत स्वच्छ विचार स्पष्टवक्तेपणा सहज सुंदर लेख अभ्यासपूर्ण लेख लिहून जोगळेकर यांनी तालुक्यात पत्रकारिता केली राजकारण समाजकारण करताना विधी निषेध पाळले तळागाळातील लोकांपर्यंत त्यांनी पत्रकारिता पोहचवली भ्रष्ट व मुजोर शासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणले प्रसाद जोगळेकर यांनी पोर्टल न्युज वर पाणीप्रश्न यावर स्पेशल विषय मांडला होता तो तयार केल्यावर मला त्यांनी फोन केला व ते पहा व मला अर्ध्या तासाने तुमची प्रतिक्रिया कळवा म्हणाले मी ठीक आहे म्हणालो आणि पंधरा मिनिटांनी मला पिलिव येथून ज्येष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे सर यांचा फोन आला व मला म्हणाले प्रसाद जोगळेकर यांची बातमी खरी आहे का मी म्हणालो कोणती तर ते म्हणाले जोगळेकर गेल्याची मला तर विश्वासाचं बसला नाही मला पंधरा मिनिटा पुर्वी त्यांचा फोन आला होता आणि अचानक नेमकं काय झाले असे दुःखद प्रसंग कोणावरही येऊ नयेत आज माळशिरस तालुक्यातील काही पोर्टल न्युज वर नागनाथअण्णा साळुंखे यांच्या निधनाची बातमी वाचली आणि धक्काच बसला माळशिरस तालुक्यातील पत्रकार असे अचानक त्यांच्या कुटुंबीयांना व आम्हा पत्रकार मित्रांना सोडून जात असल्याचे अपार दुःख आहे सामाजिक राजकीय व प्रासंगिक वातावरणात पत्रकारिता करत असताना मानसिक शारीरिक व कौटुंबिक व्यथा अडचणी चा सामना करत असताना बहुतांश पत्रकार आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अशी वेळ येत आहे या सर्व पत्रकार मित्रांना भावपूर्ण आदरांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा