*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
श्री. तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना चालकाकडुन ऊसाचे बील देण्यास विलंब लागत असल्याबाबत. दि.७ जून रोजी डॉ . सचिन ओम्बासे यांना सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव यांनी निवेदन दिले आहे
निवेदनात असे नमूद केले आहे की, श्री. तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना यांनी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा व काक्रंबावाडी येथील तसेच तालुक्यातील शेतकरी बांधवाचे गेल्या चार महिन्यापासुन ऊसाचे बील मिळत नसल्याने येणाऱ्या खरीप पिकासाठी खत आणि बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने कारखान्याचे स्थानिक अधिकारी यांच्याकडे चौकशी केली तरी फोन बंद करतात, तसेच टाळाटाळ करत आहेत. तरी यापूर्वीही निवेदने दिलेली आहेत. परंतु त्यांनी त्याची दखल अद्यापपर्यंत घेतलेली नाही.
तरी स्वतः जिल्हाधिकारी यांनी चौकशी करुन सर्व शेतकऱ्यांना त्यांचे ऊसाचे बिल येत्या 7 दिवसात मिळवून देण्यात यावे, अन्यथा सर्व शेतकऱ्याच्या वतीने दिनांक 19/06/2024 रोजी तुळजापूर येथे जुने बस स्थानक समोर रास्तारोके करण्यात येईल याची सर्वस्व प्रशासन जे मतदार असेल अशांनी विधानात नमूद केले आहे. या निवेदनावर अमोल शिवाजी जाधव,सतीश झाडे, विजयकुमार नन्नवरे , विमलचंद ठोंबरे , जेटीथोर गायकवाड , बोदला दत्तू (सरपंच ),शशिकांत खंडाळकर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा