उपसंपादक -- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
लवंग (२५/४) येथे विश्वरत्न ग्राम संघाची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.या सभेसाठी लवंग गांवचे सरपंच प्रशांत पाटील, ग्रामसेवक भाऊसाहेब मोहन मिटकल, लवंग विकास सोसायटीचे चेअरमन धनाजी भोळे, फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या संस्थापिका अध्यक्षा नूरजहाँ शेख, अस्मिता लोक संचलित केंद्राचे लेखापाल अमोल भोसले,सीआरपी वैशाली कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन , प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले व यावेळी सर्व महिलांनी " इतनी शक्ती हमे देना दाता " प्रार्थना म्हणीत कार्यक्रमास प्रारंभ केला
विश्वरत्न ग्राम संघच्या अध्यक्षा गंगावती कोकाटे यांनी सभेचे आयोजन केले होते. अस्मिता कोकाटे,बचत गटातील प्रमुख सदस्य व महिलांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला .





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा