Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०२४

*सडेतोड लेखणीच्या माध्यमातून नोकरीच्या आमिषाने "वार्षिक 25 कोटी " रुपयांना फसविणाऱ्या "टोळीचा" फाडला -बुरखा!*

 


*सांगली---पञकार*

 *इक्बाल बाबासाहेब मुल्ला*

  *मो;--8983 587 160

सडेतोड शोधपत्रकारिता !

निष्पक्ष आणि हितावह समाजप्रबोधन करत परखड दोन लेख लिहीत पालकांची आणि तरुण - तरुण - तरुणींची फसवणूक करणाऱ्या रॅकेट चा मी "पर्दाफाश" केला होता. 

आज 2 महिन्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली असून "न मिळणाऱ्या" नोकरीचे अमिष दाखवणाऱ्या कंपनीचा खोटा मुखवटा आज "उन्मळून" पडला असून पालकांना "सावध" करण्याच्या आणि तरुणींना टारगेट करण्याच्या प्रवृत्तीचा आज "बुरखा" फाटला असून समाजप्रबोधनाच्या माझ्या लेखाचे "कौतुक" होत आहे.


चेन सिस्टीमच्या माध्यमातून बेरोजगार- गरजू तरुण तरुणींना हेरून, त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, नोकरी देण्याच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या कंपनीचे भांडे फुटले असून 40000- 50,000 रुपये भरून या कंपनीमध्ये सामील झालेल्या तरुण - तरुणीचे आता धाबे दणाणले आहेत.

गेल्या 2 महिन्यापूर्वी 100 फुटी रोडवर एका कंपनीमध्ये चेनपद्धतीने चाललेल्या संदिग्ध गैरव्यवहाराबद्दल मी पालकांना सावध केले होते. सडेतोड आणि धारदार लिखाण करत फसवणुकीचा गोरखधंदा मी जगासमोर मांडला होता. माझ्या शोधपत्रकारितेच्या माध्यमातून,काही तरुणी आणि त्यांच्या पालकांच्या चर्चेअंतर्गत काही धक्कादाय गोष्टी समोर आल्या. लेखानंतर अनेक पालक यातून "सावध" होत भविष्यात होणाऱ्या फसवणूक आणि तरुणींसोबत होणाऱ्या अन्यायाबाबतीत "जागरूक" झाले.

सांगलीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात देखील अशा प्रकारच्या बोगस साखळी पद्धतीचा योजनेचा सुळसुळाट पाहावयास मिळतो. नोकरीच्या आशेने ग्रामीण आणि शहरी तरुण - तरुणी प्रभावित होऊन हजारो रुपये देतात. पालकांनी आपल्या मुलांना - मुलींना सावध करत,साखळी पद्धतीने देणाऱ्या नोकर्यांबाबत सावधगिरी बाळगावी! 

काल , कोल्हापूर रोडवरील झुंजार कार्यकर्ते सलीम पन्हाळकर आणि आनंद देसाई यांनी या भांडाफोड प्रक्रियेचा प्रारंभ केला होता .

या अन्यायाच्या विरोधात सांगलीतील नगरसेवक अभिजित भोसले ,नगरसेवक रज्जाक नाईक, विशेष कार्यकारी अधिकारी सलीम पन्हाळकर , उदय भडेकर, आनंद देसाई ,संदीप दळवी, रोहित जगदाळे, रोहित बाबर, राजू नलवडे, जोतिराम वाजे, दिनेश बाबर, प्रतीक राजमाने, शाम शिकलगार, यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी भाग घेतला.


 *इकबाल बाबासाहेब मुल्ला*

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा