Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

*अकलूज आगारामध्ये 22 सप्टेंबरला "माहिती अधिकार दिन" साजरा*


 

*विशेष ----प्रतिनिधी*

  *एहसान  मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो--9096 837 451*

अकलूज आगारात २८ सप्टेंबरला माहिती अधिकार दिवस १२.३० वाजता रेस्टरूम मध्ये 

कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कामगार साहित्यिक व व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांचे "माहिती अधिकार"

या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी अकलूज आगाराचे आगार व्यवस्थापक मा श्री प्रमोद शिंदेसाहेब ,आगार लेखाकार मा श्री सावंत

वाहतुक नियंत्रक मा श्री 

संजय पीसे,वाहतुक नियंत्रक मा श्री विजय रंधवे ,वरीष्ठ लेखनीक मा श्री उदय दुपडे तसेच बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.


   व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड बोलताना म्हणाले"भारत देशात १५ जून २००५ रोजी संसदेत हा माहिती अधिकार कायदा मंजुर करण्यात आला.जगातील स्विडन देशात १७६६ मध्ये हा कायदा सर्वप्रथम अंमलात आला.अमेरिकेत १९६६ मध्ये माहिती अधिकार कायदा अंमलात आला.जगातील ९० देशात माहिती अधिकार कायदा अंमलात आला आहे.

      यावेळी व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांचा सत्कार आगारव्यवस्थापक मा श्री प्रमोद शिंदेसाहेब यांनी केला.


       कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वरिष्ठ लेखनीक मा श्री उदय दुपडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा