*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9096 837 451*
मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या लेसरच्या लहरी (वेव्हज) डोळ्यांसाठी घातकच असतात, असे मत ज्येष्ठ नेत्रविशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांनी व्यक्त केले. डॉ. लहाने म्हणाले, ‘लेसर लाईट (Laser light) जे वापरले जातात, त्याच्या ‘अल्ट्रा व्हायलट’ची लांबी किती, यावर त्याची तीव्रता ठरते. एक, दोन आणि तीन, तीन-बी, चार, चार-बी असे त्याचे सात प्रकार आहेत.
यापैकी एक व दोन प्रकारची किरणे सौम्य प्रकारची असतात, पण यापेक्षा जास्त तीव्रतेचे लेसर वापरले जातात, त्याला परवानगी देणे चुकीचे आहे. हे लेसर वाकडे-तिकडे जात नाहीत तर सरळ जातात. हेच लेसर लाईट वाकडे-तिकडे फिरवून जे जमिनीवर आणले जातात, ते धोकादायक आहेत. हे लेसर लाईटवरती म्हणजे किमान वीस फुटांवर लावले पाहिजेत. पण, लोकांना चांगले वाटावे म्हणून लेसर लाईटचे जे झोत असतात ते जमिनीवर पाडले जातात. त्यामुळे ते डोळ्यांत जातात.
भंगार गोळा करणाऱ्या महिलेने तब्बल दहा तोळ्यांचा राणीहार केला परत; प्रामाणिकपणातून दिली माणुसकीची प्रचिती
डोळ्यांत जाताना या किरणांची तीव्रता ४०० ते १४०० इतकी असते. ही किरणे बुबुळाला इजा करतात. काळे बुबूळ त्यामुळे जळतात, त्याला ‘फोटो किरॅटॅटीस’ म्हणतात. त्यानंतर लेसर किरणे आत जाताना मोतिबिंदू होणाऱ्या लेन्सला धोका होऊन त्यामुळे मोतिबिंदू होतो. त्यापेक्षा आत जाताना दृष्टी दाखवणारा ‘रेटिना’ नावाचा एक भाग असतो, त्यापुढे सगळ्यात चांगला दिसणारा ‘पित्त बिंदू’ असतो. असे लेसर ज्यावेळी डोळ्यांवर पडतात, त्यावेळी ही किरणे ‘पित्त बिंदू’ला जाळतात. त्याला ‘मॅक्युलॉर्ग बर्न’ म्हणतात.
त्याचबरोबर लेसर ‘रेटिना’लाही जाळतो, त्याला ‘रेटिना बर्न’ म्हणतात. या जळल्यामुळे डोळ्यांत रक्तस्राव होतो. त्या डोळ्यांना सूज आल्याने ‘सेंट्र्ल व्हिजन’ असते ते निकामी होण्याचा धोका असतो. अन्य नजर शिल्लक राहते, पण मधली नजर जाते. दोनपेक्षा जास्त ‘व्हेव्हलेंथ’चे लेसर वापरल्याचा हा धोका आहे. त्याहीपेक्षा ते माणसाच्या डोळ्यांत जाईल, अशी त्याची रचना केलेली असते. त्यामुळे हे लेसर खाली आणूच नयेत, असे डॉ. लहाने यांनी सांगितले.
दीक्षांत समारंभाचा पोशाख, सत्काराच्या शालीचा रंग बदलणार; शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून समिती स्थापन
घरगुती उपायामुळे पुन्हा इजा
लेसरमुळे डोळ्यांतून रक्तस्राव झाला किंवा दृष्टी कमी झाली तर त्यावर पाणी मारणे किंवा अन्य घरगुती उपाय करू नयेत. अशा लोकांनी तत्काळ डोळ्यांच्या डॉक्टरांना डोळे दाखवून त्यावर उपाय करून घ्यावेत. घरगुती उपायामुळे पुन्हा इजा झालेल्या डोळ्याला जास्त दुखापत होण्याचा धोका असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा