इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- लुमेवाडी (ता. इंदापूर) येथील प्रसिध्द हाजी हाफिज फत्तेह मोहंमद जोधपुरी बाबा (रहे.) च्या उरुसानिमित्ताने माजी मंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांनी दर्गाहला भेट देऊन जोधपुरी बाबांच्या मजारवरती फुलांची चादर अर्पण केली व दर्शन घेतले. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी मुस्लिम बांधवांना व भाविकांना शुभेच्छा दिल्या.
जोधपुरी बाबांचा दर्गाह महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. दर्गाह विकासासाठी आपण आजपर्यंत सर्व प्रकारची मदत केलेली असून, आगामी काळातही आपले सहकार्य कायम राहील. जोधपुरी बाबांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत, असे प्रतिपादन दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी दर्गाह ट्रस्टच्या वतीने दत्तात्रय भरणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दत्तात्रय भरणे यांनी ग्रामस्थ व भाविकांशी संवाद साधला. यावेळी हनुमंत कोकाटे, नवनाथ रूपनवर, उस्मान शेख अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते.
---------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा