Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

*आजच्या पिढीने आई-वडील आणि गुरुजनांचा मान राखावा , वयोवृद्ध---- "भालचंद्र कांबळे "यांची अपेक्षा*


 

*प्राचार्य---विश्वनाथ पाटील*

  *कोडोली ता.पन्हाळा*

कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर )  / तारीख :-८ :   "आजची पिढी  प्रसारमाध्यमांच्या  विकृत प्रभावामुळे आई - वडील व शिक्षकांना नाकारतात. त्यांच्या अशा  दुर्वर्तनामुळे   आईवडिलांवर  वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. तरी आजच्या तरुण पिढीने आई - वडील व गुरुजनांचा मान राखावा," अशी अपेक्षा मिरज येथील वृध्दाश्रमवासी भालचंद्र कांबळे यांनी येथे आपल्या जीवनाची व्यथा उलगडताना व्यक्त केली.


    येथील यशवंत शिक्षणशास्त्र  ( बी. एड. कॉलेज ) महाविद्यालयाच्या  विद्यार्थी - शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय  साक्षरता दिनाचे  औचित्य साधून येथील ' सांजसावली वृद्धाश्रमा ' स  भेट दिली. त्याप्रसंगी बी. एड.च्या  विद्यार्थी - शिक्षकांनी  वृद्धव्यक्तींशी मुक्त संवाद साधला.


   यावेळी  विद्यार्थी - शिक्षकांनी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते वृद्धांना फळे दिली. याप्रसंगी सियोन सियान फाऊंडेशनचे  विश्वस्त अविनाश महापुरे यांनी वृद्धाश्रमाचा खर्च संस्थापक डॉ. प्रशांत जमने  स्वतः तसेच लोकवर्गणीतून करतात, असे सांगितले. यावेळी सावित्री गायकवाड, दशरथ कांबळे ( कोडोली ) आणि मंदाकिनी बाजीराव चोपडे  ( पुणे )  या वृध्दाश्रमवासियांनी आपल्या जीवनाचा दुःखपट  उलगडला.  


    वृध्दाश्रमाच्या व्यवस्थापिका प्राजक्ता महापुरे यांनी वृध्दाश्रमाच्या कार्यपद्धतीची  माहिती दिली.  वृध्दाश्रमभेटीचे संयोजक प्रा. एस. डी. रक्ताडे यांनी भेटीमागचा हेतू विशद केला व आभारप्रदर्शन केले. याप्रसंगी  विद्यार्थी - शिक्षकांसमवेत प्रा. श्रीमती गुलनास मुजावर, प्रा. संजय जाधव, प्रा. ए. के. बुरटुकणे ,  कार्यालीन अधीक्षक एस. के. पाटील , ग्रंथपाल विशाल शेवाळे आणि सेवक तानाजी मोहिते आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने भेटीची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा