*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
कुर्डूवाडी व परिसरातील गावांचा आणि तिथल्या विकास कामांचा मोठा खेळखंडोबा शासनाच्या दुर्लक्षपणामुळे झालेला आहे. कुर्डूवाडी शहरासह परिसरातील सुमारे ३६ गावातील रस्त्यांच्या समस्या आजही तशाच आहेत. शासनाच्या उदासीन धोरणामुळे आर पी एफ पोलीस ट्रेनिंग सेंटर, रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना स्थलांतरित झाला. या आणि अशा अनेक समस्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करून मंत्रालयाचे उंबरठे झिजून या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार, प्रसंगी आंदोलनासारखे हत्यार उपसून जनतेला व्यवसायिकांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शासनाच्या दृष्टिकोनातून आमच्या असलेल्या समस्या अगदी किरकोळ स्वरूपाच्या आहेत. मात्र याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनमानावर आणि व्यवसायिकांच्या बाजारपेठेवर होतो. शहर व छत्तीस गावातील अनेक रस्ते वर्षानुवर्ष त्याच अवस्थेत आहेत. दळणवळणाचे माध्यम असलेल्या रस्त्यांच्या समस्या खूप मोठ्या बनल्या आहेत. प्रशासनाने शासन दरबारी पाठपुरावा करून रस्त्यांचे डागडूजी व नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय कुर्डूवाडी शहरालगतच असलेला रेल्वे निर्मितीचा कारखाना बंद पडला. कुर्डूवाडी शहरालगत असलेले आर पी एफ पोलीस ट्रेनिंग सेंटर बंद झाले. रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना व आर पी एफ पोलीस ट्रेनिंग सेंटर बंद झाल्यामुळे कुर्डूवाडी भागातील अनेक बाबींवर मोठा परिणाम झाला आहे. शेकडो पोलीस या ठिकाणी ट्रेनिंग घेत होते. यामुळे शेतकऱ्यांच्या फळभाज्या, पीक पिके मोठ्या प्रमाणात विकल्या जायच्या. स्थानिक व्यवसाय देखील यामुळे तेजीत चालायचे. मात्र हे आर पी एफ पोलीस ट्रेनिंग सेंटर व रेल्वे निर्मितीचा कारखाना शासनाने या ठिकाणहुन स्थलांतरित केल्यामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी औदुंबर सावंत, महादेव सावंत, मोहन सावंत, निसार काझी, बापू सावंत, हरीश गिड्डे, प्रकाश सावंत, लखन लाड, नितीन जाधव, शंकर सावंत, संदीप राऊत, बालाजी सावंत, गणेश ओहोळ, रोहिदास अवचर, ज्ञानेश्वर आवचर, मनोहर गुजले, चतुर्भुज सावंत, भाऊसाहेब लोहार, राजकिरण ओहोळ, औदुंबर सावंत, हनुमंत लाड, संतोष लोहार, प्रेम लोहार यांच्यासह जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा