Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

*यशवंतनगर येथील लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी बनवल्या पर्यावरण पूरक बाप्पांच्या मुर्त्या*


 

*अकलुज ---प्रतिनिधी*

  *शकुरभाई  तांबोळी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी  पर्यावरण पूरक गणपती बाप्पा च्या मुर्त्या  बनवल्या  असुन 

विद्यार्थिनींना पर्यावरण पूरक गणपती स्वतःच्या हाताने तयार करता यावे  या हेतूने शिक्षण प्रसारक मंडळ ,अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशालेमध्ये पर्यावरण पूरक गणपती तयार करणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .विद्यार्थिनींनी पर्यावरण पूरक मुंबई माती(बॉम्बे क्ले)चा वापर करून आपल्या मनातील,आपल्या कल्पकतेनुसार खूप छान सुंदर असे  गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार केल्या.आपल्या स्वतःच्या हाताने गणपती बाप्पांची मूर्ती आपण तयार करू शकलो याचा आनंद सहभागी सर्व विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.दरवर्षी याचप्रमाणे पर्यावरण पूरक गणपती तयार करून त्याच गणपतीची प्रतिष्ठापना आम्ही आमच्या घरी करू असा विश्वास विद्यार्थिनींनी बोलून दाखवला.



सहभागी सर्व विद्यार्थिनींचे संस्थेचे मार्गदर्शक संचालक - जयसिंह मोहिते -पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते - पाटील ,संस्थेच्या संचालिका तथा प्रशालेच्या सभापती कु. स्वरूपाराणी मोहिते- पाटील , सचिव अभिजीत रणवरे  ,सहसचिव खराडे पाटील  यांनी कौतुक केले.

कार्यशाळेसाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका .पवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.प्रशालेचे चित्रकला शिक्षक विशाल लिके यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.कार्यशाळेसाठी इतर सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा