Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

*निमगाव (म)येथील पै.रावसाहेब मगर यांना 'मराठा सेवा संघाचा '"मराठा भूषण पुरस्कार" प्रदान..*


 

*प्रतिनिधी --संजय निंबाळकर*

 *दसूर ता.माळशिरस.*

मराठा सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा  क्रीडा क्षेत्रातील "मराठा भूषण पुरस्कार" निमगाव (मगराचे )येथील मल्लसम्राट पैलवान रावसाहेब आप्पा मगर यांना आज समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला         

          यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील  माढा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित ,खासदार धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच- शिवतेजसिंह  मोहिते पाटील, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तमराव माने, मराठा सेवा संघाचे माळशिरस तालुकाध्यक्ष निनाद पाटील, शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक हरिश्चंद्र मगर, युवराज मगर, बाळासाहेब मगर ,नंदकुमार अगतराव मगर पाटील, दत्तात्रय मगर ,विश्वनाथ मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा